इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीचे न्यूड फोटो थेट काकाच्या व्हाट्सअपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 21:00 IST2022-12-19T20:59:56+5:302022-12-19T21:00:13+5:30
तरुण तरुणीचे बिनसल्यावर मात्र न्यूड फोटो थेट तिच्या काकाच्या व्हाट्सअप नंबरलाच पाठवले

इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीचे न्यूड फोटो थेट काकाच्या व्हाट्सअपला
पुणे/किरण शिंदे : इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर एका अनोळखी तरुणासोबत झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर दोघे एकत्र आले, प्रेमात पडले आणि त्यांच्यात संबंधही आले. बिनसल्यावर मात्र या तरुणाने तरुणीचे न्यूड फोटो थेट तिच्या काकाच्या व्हाट्सअप नंबरलाच पाठवले. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय बाळू सीतापे उर्फ ज्ञानेश्वर बाळू सीतापे (वय 21, माळीनगर, अकलूज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील 21 वर्षे तरुणीने तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी पुण्यातील आहे. तर आरोपी हा अकलूज येथील रहिवासी आहे. दोघेही खाजगी कंपनीत नोकरी करतात. ऑक्टोबर 2021 मध्ये या दोघांचीही इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीतून दोघे एकत्र आले. प्रेमात पडले आणि स्वारगेट येथील एका प्रसिद्ध लॉजवर त्यांच्यात शारीरिक संबंधही आले. या दरम्यान आरोपीने फिर्यादी तरुणीचे काही न्यूड फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते.
काही दिवसांनी या दोघांचेही बिनसले आणि त्यानंतर या तरुणीने आरोपीला भेटण्यासाठी नकार दिला. आरोपी मात्र तिला भेटण्यासाठी वारंवार जबरदस्ती करू लागला. यासाठी तो तिचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तरीही तरुणी ऐकत नाही म्हटल्यावर आरोपीने हे न्यूड फोटो थेट तिच्या काकाच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवले. यानंतर मात्र तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.