सत्ता, संपत्तीपेक्षा जगण्यातील समृद्धता अनुभवा - सलील कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 02:44 AM2018-02-01T02:44:14+5:302018-02-01T02:44:24+5:30

सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले.

 Experience richness of wealth and wealth - Salil Kulkarni | सत्ता, संपत्तीपेक्षा जगण्यातील समृद्धता अनुभवा - सलील कुलकर्णी

सत्ता, संपत्तीपेक्षा जगण्यातील समृद्धता अनुभवा - सलील कुलकर्णी

Next

राजगुरुनगर : सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत कवितेचं गाणं होतांना या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर,अ‍ॅड.माणिक पाटोळे, उमेश आगरकर, अंकुश कोळेकर, माजी जि. प. सदस्य अनिल राक्षे, अ‍ॅड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रा. ए.जी. कुलकर्णी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ सलील कुलकर्णी म्हणाले, आजकाल कोणीही पैशाची, कलेची किंव्हा राजकारणातील ताकदीची टिमकी वाजवीत असून समाजात बेडरपणा, निर्लज्जपणा अथवा पैशाची धुंदी वाढत चालली आहे. मात्र माणसाच्या मेंदूमधील एक छोटीशी रक्तवाहिनी तुमचं बोलणं चालू ठेवायचे की बंद करायचे हे ठरवू शकते. या पार्श्वभूमीवर माणसाने माणुसकी धर्म पाळला नाही तर माणसाची माय असलेली माती जेंव्हा हिशोबाला बसते तेंव्हा कोणालाच सोडत नाही अशी भावना मांडली. कुसुमाग्रजांच्या मातीची दर्पोक्ती या कवितेचे उदाहरण देताना ह्यअभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोष पाऊले पडती आमच्यावरुनी, त्या मत्त पदांना नच जाणीव अजुनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती, मातीवर चढणे एक नवा थर अंतीह्ण या ओळी सादर केल्या. पुन्हा एकदा पहिल्यापासून जगण्यासाठी ह्यलपवलेल्या कचरा या पुस्तकातील एका लेखाचे अभिवाचन केले.

या कार्यक्रमात त्यांनी उच्चरणातील आनंद, मनाला उल्हास व प्रसन्नतेचा भाव देणारी ह्यअग्गबाई डग्गुबाईह्ण या अल्बममधील बालगीते तसेच हे गजवदन, येई गा विठ्ठला, क्षण अमृताचे, आयुष्यावर बोलू काही या अल्बममधील गीते सादर केली. गीतकार सुधीर मोघे, कवयित्री शांताबाई शेळके, कवी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, ग्रेस या कवींच्या कवितांचे वेगवेगळे पदर, त्यातील सौदर्यस्थळ उलगडून दाखविली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांना कविता चांगली समजते असे सांगून त्यांच्याबरोबरब केलेला मैत्र जीवांचे या कार्यक्रमाच्या आठवणी सांगितल्या व त्यांची लोकप्रिय गीतेही सादर केली. भावसंगीतातील परमेश्वर असे लतादीदींचे वर्णन करून अजूनही त्या संगीतकाराच्या सूचनांनुसार गीत गातात. त्यांची शिकण्याची भूक कमी झाली नाही असे ते म्हणाले.
 

Web Title:  Experience richness of wealth and wealth - Salil Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे