अनुभवला वेगाचा थरार

By admin | Published: September 19, 2014 12:59 AM2014-09-19T00:59:52+5:302014-09-19T00:59:52+5:30

आम्ही विमानामधून हवेत उडी घेतली तेव्हा पहिल्या एक मिनिटात पॅराशूट उघडण्यापूर्वी आम्ही ताशी 25क् किमी प्रतिताशी वेगाने जमिनीकडे जात होतो.

Experience the Velocity of Velocity | अनुभवला वेगाचा थरार

अनुभवला वेगाचा थरार

Next
लोणावळा : आम्ही विमानामधून हवेत उडी घेतली तेव्हा पहिल्या एक मिनिटात पॅराशूट उघडण्यापूर्वी आम्ही ताशी 25क् किमी प्रतिताशी वेगाने जमिनीकडे जात होतो. पॅराशुट उघडल्यानंतर पुन्हा हवेत स्थिरावलो हा थरारक अनुभव अविस्मरणीच होता.वेगाचा हा थरार स्कायडायव्हिंगमुळे अनुभवता आला., असे स्पेनमधील बार्सिलिनो शहरात स्कायडायव्हिंग स्पर्धेत विश्वविक्रम नोंदविणा:या भारतीय पथकातील अब्दुल हमीद यांनी सांगितले.
लोणावळ्यानजिकच्या वलवण गावात राहणा:या हमीदसह पुण्यातील 35 जणांनी एका तासात एकाच वेळी विमानातून 4 हजार मिटर उंचीवरुन टॅन्डम स्कायडाय करत विश्वविक्रम नोंदविला़ त्याचबरोबर या स्पर्धेत अमेरीकेच्या 28 स्पर्धकांनी यापुर्वी एका तासात एकाच वेळी स्कायडाय करत नोंदविलेला विक्रमही मोडीत काढला़ या स्पर्धेतील सहभागाबद्दल आणि नोंदविलेल्या विश्वविक्रमाबद्दल हमीद बोलत होते. 
हमिद म्हणाले, ज्यावेळी  मनाच्या एकाग्रतेशिवाय स्कायडायव्हिंग शक्य नाही. प्रथम हा प्रयोग करताना भिती वाटते. मात्र, यातील ‘थ्रिलचा अनुभव हा काही वेगळाच आह.े हा वेगाचा थरार मला स्कायडायमुळे अनुभवायला मिळाला़ (वार्ताहर)
 
4मी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रत काम करतो, वास्तविक स्कायडायचा व माझा काही संबंध नाही. पण, लहानपणी मला पॅराशुट उडवण्याची हौस होती. पुण्यातील स्काय डायव्हिंग अॅकेडमीच्या शितल महाजन यांच्या मार्गदर्शनामधून प्रेरित होऊन स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आत्मविश्वास व सचोटीच्या जोरावर ह्या स्पर्धेत विजयी झालो़ भविष्यात स्काय डायव्हिंगचे जास्तीचे प्रशिक्षण घेऊन सोलो स्कायडाय करण्याचा मानस आहे. लोणावळा परिसरातील विद्याथ्र्याना या खेळा बाबतचे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे हमीद यांनी सांगितले.
 

 

Web Title: Experience the Velocity of Velocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.