रविवारी अनुभवा धमाल गल्लीची रंगत

By admin | Published: May 4, 2017 02:59 AM2017-05-04T02:59:43+5:302017-05-04T02:59:43+5:30

आपल्या भेटीला ‘लोकमत’ घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही

Experiences dazzling lanyard on Sunday | रविवारी अनुभवा धमाल गल्लीची रंगत

रविवारी अनुभवा धमाल गल्लीची रंगत

Next

पुणे : आपल्या भेटीला ‘लोकमत’ घेऊन येणार आहे एक आगळावेगळा कार्यक्रम यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींनाही धमाल करण्याची संधी मिळणार आहे. मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात फक्त मनोरंजन होणार नाही, तर लहान मुलांच्या मनावर चांगले परिणाम होतील; तसेच बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल.
‘फिटनेस मंत्राज’द्वारे या ठिकाणी मोफत आरोग्य व बीएमआयसंदर्भात सल्ला दिला जाणार आहे. एच. पी. ज्वेलर्सतर्फे भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत; तसेच ‘सायकल वर्ल्ड’तर्फे विविध प्रकारातील सायकल चालवण्याची मोफत संधी लाभणार आहे. प्रायोजक मॅपल ग्रुप, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, सायकल पार्टनर - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, फॅशन पार्टनर - मॅक्स, किड्स पार्टनर - लिटल अ‍ॅली (विमाननगर), ऱ्हिदम पार्टनर - ताल इंक यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडणार आहे. (प्रतिनिधी)
झेन्सर टेक्नॉलॉजिजसमोर, रिलायन्स स्मार्टजवळ, खराडी रोड येथे दि. ७ व १४ मे सकाळी ७ ते ९.३० या वेळेत धमाल करण्याची संधी मिळणार आहे.


अनेक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी

या कार्यक्रमात पाच भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी देण्यात येणार आहेत. लोकप्रिय डान्सचा प्रकार असून, तरुणाईला एन्जॉय करता येणार आहे, पूर्वी सायकलींचे असलेले पुणे शहर आता दुचाकीचे बनलेले आहे, त्यामुळे सायकल चालवून आपली पूर्वीची ओळख पुन्हा मिळविण्याचा धमाल गल्लीचा प्रयत्न यावर्षीही असणार आहे, पुणेरी पगडी घालण्याची संधी मिळणार आहे.
मोकळ्या रस्त्यावर स्के टिंगच्या थ्रीलची मजा अनुभवण्याची संधी मिळणार आहे, भर रस्त्यावर उभे राहून बॅडमिंटनचे रॅकेट हातात घेऊन खेळण्याची संधी मिळणार आहे,
टॅटू-नेलपेंट-मेंदी रंगविण्याची संधी, मुलींच्या नखावर नक्षीकामाचा उपभोग घेता येणार आहे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सेल्फी काढून फेसबुकवर टॅग करा. त्यातील निवडक सेल्फी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले जातील.
 

Web Title: Experiences dazzling lanyard on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.