‘जायका’साठी नेमणार तज्ञ समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:29+5:302020-12-03T04:19:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुळा-मुठा नदीच्या सुधारणेकरिता राबविण्यात येणाऱ्या जायका प्रकल्पासाठी तज्ञ समिती नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुळा-मुठा नदीच्या सुधारणेकरिता राबविण्यात येणाऱ्या जायका प्रकल्पासाठी तज्ञ समिती नेमण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या समितीत अभियंत्यांपासून तज्ञांचा समावेश करणार असल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
शहरातील नद्यांच्या गटारगंगा झाल्या असून त्या सध्या मृतावस्थेत आहेत. या नद्यांना नवसंजीवनी देण्यासाठी तसेच शहरातील मैलापाणी नदीमध्ये शुद्ध करुन सोडण्यासाठी नदी सुधार प्रकल्प आणण्यात आला. २०१६ साली आणलेल्या या योजनेची गेल्या चार वर्षात प्रगतीच झाली नाही. या प्रकल्पाच्या सहा टप्यातील निविदा वाढीव दराने आल्याने रद्द करण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पासाठी एकच निविदा काढण्यास राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालयाने मान्यता दिली आहे. या निविदांसह प्रकल्पाचे काम अधिक वेगाने व्हावे याकरिता तज्ञ समिती नेमण्यात येणार आहे. पाणी पुरवठा, विद्युत विभाग आणि बांधकाम विभागातील अभियंते आणि अधिका-यांचा समावेश केला जाणार आहे. प्रकल्पाच्या पुर्वगणपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर तसेच आचारसंहिता संपल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.