लग्नाच्या आमिषाने जवानाकडून शोषण

By admin | Published: July 7, 2017 02:38 AM2017-07-07T02:38:59+5:302017-07-07T02:38:59+5:30

लग्नाचे आमिष दाखवून सहा वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्याचे नाकारून लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध

Exploitation by the victim | लग्नाच्या आमिषाने जवानाकडून शोषण

लग्नाच्या आमिषाने जवानाकडून शोषण

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : लग्नाचे आमिष दाखवून सहा वर्षे शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्याचे नाकारून लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून राज्य राखीव दलाच्या जवानाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमोल बबन सपकळ (रा. कळाशी, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याच गावी असणाऱ्या २५ वर्षे वयाच्या तरुणीने त्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते तिच्या घरातल्या मंडळींनाही माहित होते. लग्नाचे आमिष दाखवून तिला अकलूज, माळशिरस या ठिकाणच्या लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती ही त्याच्या घरच्यांना कधी लग्न करणार, याची विचारणा करत होती. आरोपीला ही विचारत होती. त्याने आपण सज्ञान आहोत परंतु, आपल्या लग्नाला घरच्यांचा विरोध आहे, असे तिला सांगितले.

Web Title: Exploitation by the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.