शिवकालीन शिलालेख, किल्ला,शिल्प आदी गोष्टी संशोधनात्मक अभ्यासातून प्रकाशात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:33 PM2020-01-11T12:33:52+5:302020-01-11T12:43:01+5:30

इतिहास कधीच पुसला जात नाही. ते खरं...

An exploratory study of the things of Shiva | शिवकालीन शिलालेख, किल्ला,शिल्प आदी गोष्टी संशोधनात्मक अभ्यासातून प्रकाशात

शिवकालीन शिलालेख, किल्ला,शिल्प आदी गोष्टी संशोधनात्मक अभ्यासातून प्रकाशात

googlenewsNext
ठळक मुद्देइतिहास अभ्यासक प्रसाद तारे : भारत इतिहास संशोधक मंडळात निबंध सादरशिवकाळात समाधी मंदिर गेली २७ वर्षे छत्रपती शिवाजी महाराज, गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, शिल्प व लेणी यांचा अभ्यास

पुणे : शिखर-शिंगणापूर येथील शिवकालीन शिलालेख, प्रतापगडावरील शिलालेखाच्या खाणाखुणा, सुरतेच्या वाटेवरील किल्ला, पाटगाव येथील शिवकालीन शिल्प अशा शिवकालीन गोष्टींचा संशोधनात्मक अभ्यास इतिहासाचे अभ्यासक प्रसाद तारे यांनी केला आहे.
तारे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे चार निबंधांचे वाचन केले. निबंधातून हे विषय अभ्यास करून मांडण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील शिखर- शिंगणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेला शिवकालीन शिलालेख प्रकाशात आला आहे. शिलालेख मंदिराच्या एका पायरीवर संभाजीराजे भोसले व शिवाजीराजे भोसले अशा दोन ओळी कोरलेल्या आहेत. पहिल्या ओळीमध्ये शहाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचे नाव तर दुसºया ओळीमध्ये धाकटे पुत्र शिवाजी महाराजांचे नाव कोरलेले आहे. संभाजी महाराज इ.स. १६५४-५५ च्या सुमारास लढताना धारातीर्थी पडले. म्हणजेच हा शिलालेख इ.स. १६३० ते १६५४ दरम्यानचा असला पाहिजे. हा शिलालेख शहाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या आदेशावरून कोरला असावा असा तर्क आहे.
प्रतापगडावरील श्री भवानीमातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दारात एका दगडी पायरीवर शिलालेख कोरलेला आहे. पायरीची झीज झाल्याने अक्षरे वाचण्यायोग्य राहिली नाहीत. पण निरखून पाहिल्यास देवनागरी लिपीतील अक्षरे दिसून येतात. शिवाजी महाराजांनी देवीचे मंदिर इ.स. १६६२ च्या आधी बांधले आहे. शिलालेखही त्याच सुमारास कोरला असणे सयुक्तिक आहे.


दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील धरमपूर तालुक्यात पिंडवल नावाचा किल्ला प्रकाशात आला आहे. सुरतेवर दोन स्वाऱ्या झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे इ.स. १६७६ च्या सुरुवातीस शिवाजी महाराजांनी कोकणच्या उत्तरेकडील व सुरतेच्या परिसरातील रामनगर राज्याचा मुलुख जिंकण्यासाठी आपले सैन्य पाठवले होते. 
स्वराज्याच्या सैन्याने रामनगर राज्य जिंकले व त्यातील पिंडवलच्या डोंगरावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. तशी स्पष्ट नोंद त्यावेळी सुरतेच्या वखारीमध्ये असलेल्या इंग्रजांनी लिहिलेल्या पत्रात आली आहे. 
हे पत्र आधीच प्रकाशित असून २५ मे १६७६ या तारखेचे आहे. किल्ल्याची लांबी सुमारे चारशे मीटर इतकी आहे.
.....
शिवकाळात समाधी मंदिर 
कोल्हापूर पाटगाव येथे शिवकाळातच मौनीमहाराजांचे समाधी मंदिर उभारण्यात आले होते. या मंदिराच्या भिंतीवर काही ऐतिहासिक प्रसंग शिल्परूपात तयार करून बसवले आहेत. 
त्यामध्ये कोणी महत्त्वाची व्यक्ती, सैन्याबरोबर जाणारे विशेष योद्धे अशा व्यक्तीरेखा कोरलेल्या आहेत. ही शिल्पे स्वराज्याशी संबंधित महत्त्वाच्या सेनाधिकाऱ्यांची आणि शिवाजी महाराजांची असावीत असा तर्क आहे.
...
मी गेली २७ वर्षे छत्रपती शिवाजी महाराज, गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, शिल्प व लेणी यांचा अभ्यास करत आहे. या संशोधनात्मक गोष्टींचा अभ्यास मांडणारे पुस्तकही प्रकाशित होणार आहे.- प्रसाद तारे 
.....................

Web Title: An exploratory study of the things of Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.