स्फोटाने कुरकुंभ औद्योगिक वसाहत पुन्हा हादरली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:00 PM2019-10-22T13:00:51+5:302019-10-22T13:03:55+5:30

हा प्लांट स्वयंचलित असल्याने व सुदैवाने रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने परिसरात कामगार नव्हते.

The explosion blast once again in the Kurumbh Industrial Estate | स्फोटाने कुरकुंभ औद्योगिक वसाहत पुन्हा हादरली

स्फोटाने कुरकुंभ औद्योगिक वसाहत पुन्हा हादरली

Next
ठळक मुद्देअपघात झालेला पीईए हा प्लांट जून २०१८ मध्ये स्थापनकुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील स्फोटाची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील इटर्निस फाइन केमिकल्स कंपनीतील फिनाइल इथाइल असिटेट (पीईए) या प्लांटमध्ये स्फोट झाला. हा प्लांट स्वयंचलित असल्याने व सुदैवाने रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने परिसरात कामगार नव्हते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. 
इटर्निस कंपनीत फिनाइल इथाइल असिटेट (पीईए) निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असताना तिसºया मजल्यावर असणाऱ्या हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडच्या फायबर टाकीचा अचानक स्फोट झाला.  या टाकीची साठवण क्षमता ही जवळपास साडेतीन हजार लिटर आहे. प्रक्रियेदरम्यान टाकीत फक्त २२० लिटर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड शिल्लक राहिले असल्याची माहिती कंपनीचे सुरक्षा अधिकारी नामदेव हरिहार यांनी दिली. 
हा प्लांट सर्व प्रकारे ऑटोमेशन प्रक्रियेनुसार चालतो. यामध्ये मुख्यत्वे करून कामगारांची जास्त गरज भासत नाही. त्यामुळे फक्त तांत्रिकदृष्ट्या माहिती असणारेच यामध्ये कार्यरत असतात. हरिहार यांच्या माहितीनुसार सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरू असताना झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करूनच यामध्ये स्फोट नक्की कसा झाला, हे सांगणे योग्य होणार आहे. 
कुरकुंभ येथील इटर्निस कंपनी ही एका मोठ्या उद्योगात समावेश असणारी कंपनी आहे. यापूर्वीदेखील यामध्ये अनेक वेळा अपघात झालेले आहेत. त्यामुळे या कंपनीत सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. अपघात झालेला पीईए हा प्लांट जून २०१८ मध्ये स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक सर्व सुविधा देण्यात आल्यामुळेच या अपघाताची व्याप्ती वाढू शकली नाही. टाकीच्या बाजूला असणारी डाइक वाल (सुरक्षा भिंत) असल्याने स्फोट झालेल्या टाकीतील अ‍ॅसिड इतरत्र पसरू शकले नाही. त्यामुळे यामध्ये जीवितहानी अथवा कुठल्याही प्रकारची गंभीर घटना घडली नसल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक विजय खाडे व बसवराज बकील यांनी उपस्थितांना दिली.

Web Title: The explosion blast once again in the Kurumbh Industrial Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.