कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात स्फोट

By admin | Published: March 30, 2017 12:24 AM2017-03-30T00:24:58+5:302017-03-30T00:24:58+5:30

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील दत्ता हायड्रोकेम या कंपनीला संध्याकाळी साडेसातच्या

Explosion in the Kurukumba industrial area | कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात स्फोट

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात स्फोट

Next

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील दत्ता हायड्रोकेम या कंपनीला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्पार्किंगमुळे आग लागली. यामध्ये गोकुळ अंकुश गरगडे (वय ३५, रा. जिरेगाव, ता. दौंड), मनीष यादव (रा. उत्तर प्रदेश) हे दोघे गंभीर जखमी आहेत. या जखमींना उपचारांसाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात
आले आहे.
दत्ता हायड्रोकेम ह्या कंपनीत पेन्टेन या केमीकलपासून कार्बन हायड्रोजन उत्पादन केले जाते.
या कंपनीला संध्याकाळी सहा नंतर कुठल्याही प्रकारे उत्पादन टँकरमध्ये भरण्याचा परवाना नसल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. दरम्यान ज्या टँकर मध्ये हायड्रोजन भरण्याचे काम सुरू होते त्याला देखिल आग लागली मात्र सुदैवाने शेजारील ओनर लँब कंपनीच्या अग्निशामक दलाने त्यावर नियंत्रण मिळवले व त्यानंतर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाचे अधिकारी कपील राठोड, मोहन जाधव, दिलीप माने, ज्योतीराम शिंदे व त्याच्या सहकारीवर्गाने तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
याबाबत येथील व्यवस्थापक जालींदर देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, कंपनीला लागलेली आग स्पार्कमुळे लागली आहे. झाली असल्याची माहीती मिळाली या कंपनीचे मालक अतुल मावडीकर हे पुण्यात स्थायीक असुन त्यांच्याशी संपर्क होवु शकला नाही.

मोठा धोका टळला
हायड्रोजन सारख्या अत्यंत ज्वलनशील वायुने पेट घेतल्यामुळे नागरिक धास्तावले औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाने मोठ्या शिताफीने या आगीवर नियंत्रण मिळवत सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान दौंडचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व सहकारी यांनी घटनास्थळी धाव देत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Explosion in the Kurukumba industrial area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.