Video: पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ २० ते २५ गँस सिलेंडरचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 05:53 PM2022-03-29T17:53:13+5:302022-03-29T20:27:57+5:30

लॉन्सशेजारी सिलेंडरचा बेकायेदशीर साठा असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं

Explosion of 10 guns cylinders in a row in Katraj Pune | Video: पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ २० ते २५ गँस सिलेंडरचा स्फोट

Video: पुण्यातील कात्रजमध्ये एकापाठोपाठ २० ते २५ गँस सिलेंडरचा स्फोट

googlenewsNext

धनकवडीकात्रज परिसरातील सुदामाता मंदिर परिसरात सर्वे नंबर ६३ बाबाजीनगर भागात सायंकाळी तब्बल पंचवीस पेक्षा जास्त सिलेंडरचे स्फोटमुळे मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घटली. कात्रज अग्निशामक केंद्राबरोबरच कोंढवा आणि भवानी पेठ अग्निशामक केंद्रातील गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोट झालेले ठिकाणी उंचीवर असल्याने आणि गाड्या जाण्यास पुरेसा रस्ता नसल्याने जवळपास दोनशे फुट लांब पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा करून आगी वर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक केंद्रातील जवानांना यश मिळाले.

कात्रजमधील गंधर्व लॉ़न्स पासून जाणाऱ्या मार्गावर ही भयानक घटना घडली आहे. सिलेंड़रचे एकापाठोपाठ एक असे स्फोट झाल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवित अजून कुठे लिकेज आहे का याची तपासणी सुरू आहे. मालक किरकोळ जखमी आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारीही घेण्यात आली आहे.

अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण

कात्रजमधील गंधर्व लॉन्स पासून जाणाऱ्या मार्गावर डोंगर उतारावर बाबाजीनगर येथे दहा बाय वीस आकाराच्या एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये अनधिकृतरित्या गॅस रिफिलींग करण्याचे काम सुरू होते. व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर मधून छोट्या सिलेंडर मध्ये गॅस भरून त्याची बेकायेशीररित्या विक्री करण्यात येत होती. सोमवारी सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान, अचानक रीफिलिंग करताना काहीतरी गडबड झाली आणि सिलेंडर ने पेट घेतला. त्यानंतर एकापाठोपाठ एक सिलेंडर पेटल्याने आगीचा भडका उडाला आणि आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात झेपावले आणि परिसरातील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच, कात्रज अग्निशामक केंद्राबरोबरच कोंढवा आणि भवानी पेठ अग्निशामक केंद्रा तील सहा गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोट झालेले ठिकाण टेकडीच्या उंचीवर असल्याने आणि गाड्या जाण्यास अरूंद रस्ता असल्याने जवळपास दोनशे फुट लांब पाईपच्या साह्याने पाण्याचा मारा करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविण्या अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले.

Web Title: Explosion of 10 guns cylinders in a row in Katraj Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.