निर्यात, जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन साखळी अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:08+5:302021-04-15T04:10:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग आणि त्यांची उत्पादन साखळी अबाधित राहील. कोरोना नियमांचे ...

Export, production chain of essential commodities uninterrupted | निर्यात, जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन साखळी अबाधित

निर्यात, जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन साखळी अबाधित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : जीवनावश्यक वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग आणि त्यांची उत्पादन साखळी अबाधित राहील. कोरोना नियमांचे पालन करून कामावर येणाऱ्या कोणत्याही कामगारांची आणि पुरवठादारांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (दि.१४) दिले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यात संदिग्धता असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीगकल्चर (एमसीसीआयएने) वेबिनार आयोजित केला होता. त्यात विभागीय आयुक्त राव बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, अविनाश हदगल, एमसीसीआयएचे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.

टाळेबंदी निर्बंधाबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर व्हावा. नियमांचे पालन करणे सोयीचे जावे यासाठी संभ्रम दूर करण्याचे आवाहन, मेहता यांनी केले. तर, पुण्यातून दरमहा पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा माल निर्यात होतो याकडे गिरबने यांनी लक्ष वेधले.

विभागीय आयुक्त राव म्हणाले, जीवनावश्यक वस्तू आणि सेवा अबाधित राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी उत्पादन साखळी सुरळीत राहील. गेल्या वर्षीच्या टाळेबंदी मार्गदर्शक सूचनेत निर्यात केल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश नव्हता. निर्यात केले जाणारे उद्योग सुरू राहील याची काळजी घेतली जाईल.

ऑटो उद्योगातून मोठी निर्यात

औषध, शेतमाल आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग, डेअरी, फोर्जिंग, स्टील, पेंट उद्योग सुरू राहतील. तसेच त्यांना पुरवठा करणारी उत्पादन साखळी अबाधित राहील. तसेच निर्यातक्षम उद्योग सुरु राहतील. पुण्यामध्ये ऑटो उद्योग मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे निर्यातीचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे हा उद्योग सुरू राहील. कामगारांना कामावर जाण्यासाठी अडचण येणार नाही. त्यांचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल, असे उद्योग सहसंचालक सुरवसे यांनी स्पष्ट केले.

---

उद्योगांवर उगाचच कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. कोरोना नियमांचे पालन केल्यास बाधितांचा आकडा निश्चितच खाली येईल. मात्र, ते आपण किती निर्बंध पाळतो त्यावर अवलंबून आहे. निर्बंध पाळले न गेल्यास नाईलाजाने टाळेबंदीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या घराचा उंबरठा केव्हाच ओलांडला आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे प्रामाणिकपणे पालन ठरावे.

- सौरभ राव, विभागीय आयुक्त

Web Title: Export, production chain of essential commodities uninterrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.