निर्यातीच्या द्राक्षबागांचे क्षेत्रही हवे किडरोगमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:31+5:302021-01-01T04:08:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : निर्यात होणाऱ्या द्राक्षाच्या बागांचे क्षेत्र किडरोग मुक्त करण्यासाठी देशात पहिल्यांदाच उच्चस्तरीय अधिकाºयांची एक समिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : निर्यात होणाऱ्या द्राक्षाच्या बागांचे क्षेत्र किडरोग मुक्त करण्यासाठी देशात पहिल्यांदाच उच्चस्तरीय अधिकाºयांची एक समिती स्थापन केली आहे. राज्यातील नोंदणी झालेल्या ४५ हजार बागांची या समितीकडून त्यासाठी पाहणी करणार आहे.
ज्या देशांमध्ये द्राक्ष निर्यात केली जातात त्या देशांच्या मागणीवरून ही पाहणी करणार आहे. यापुर्वी त्यांनी दिलेल्या निकषांनुसार फक्त उत्पादनाची म्हणजे, द्राक्षांची तपासणी करण्यात येत असे. मात्र आता त्या देशांकडून ज्या क्षेत्रात द्राक्ष पिकवली जातात त्या क्षेत्रातही कसला रोग किंवा किड नाही ना याची पाहणी करण्याची व त्यानुसार ते क्षेत्र प्रमाणीत करण्याची मागणी झाली होती. देशातील एकूण द्राक्ष निर्यातीच्या ९५ टक्के द्राक्ष निर्यात महाराष्ट्रातून व त्यातील ६५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होत असते. त्यामुळे केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने राज्याच्या कृषी मंत्रालयाला ही समिती स्थापन करण्याबाबत एप्रिल २०२० मध्ये कळवले होते.
राज्याच्या फलोत्पादन कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. राज्याचे निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी ही माहिती दिली. समितीमध्ये किटक शास्त्रज्ञांसह कृषी विभागाच्या वेगवेगळ्या उच्चस्तरीय अधिकाºयांचा समावेश आहे. या समितीकडून तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना पाहणी बाबत प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात एकूण ४५ हजार द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. त्यातील ३५ हजार द्राक्ष बागा नाशिक जिल्ह्यात आहेत. तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांकडून प्रत्येक बागेची व समितीकडून त्यातील काही बागांची पाहणी केली जाईल. दिलेले निकष बाग मालकाला सांगितले जातील. त्याप्रमाणे बागेचे संपुर्ण क्षेत्र किड मुक्त आहे किंवा नाही याची तज्ज्ञांकडून पाहणी करून तसे प्रमाणित करून घेण्यात येईल व ती माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाला कळवली जाईल.