अश्वगंधाची निर्यात तिपटीने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:25+5:302021-02-11T04:13:25+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध संस्थांच्या समावेशातून आयुष महासंघ स्थापन करण्याच्या सामंजस्य करारानिमित्त कोटेचा पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध संस्थांच्या समावेशातून आयुष महासंघ स्थापन करण्याच्या सामंजस्य करारानिमित्त कोटेचा पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन उपस्थित होते.
कोटेचा म्हणाले, कोरोना काळात विविध संस्थांच्या माध्यमातून आयुष संबंधित अनेक संशोधन, सर्वेक्षण केले. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिविरसारख्या औषधांचे गुणधर्म आयुर्वेदिक औषधांमध्ये असल्याचे संशोधनांतून दिसून आले आहे. त्यापैकी काही औषधांच्या चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे. आयुषच्या संशोधनांमध्ये पुणे हे महत्त्वाचे केंद्र होते. या क्षेत्रातील संशोधनांसाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च केला.
कोरोनात आयुष क्षेत्रातील संशोधनात मिळाली, असे नमूद करून कोटेचा म्हणाले, कोरोना काळात आयुष औषधांच्या संशोधनालाही चालना मिळाली. आयुर्वेदिक काढा, चूर्ण, च्यवनप्राशसाख्या उत्पादनांना मागणी वाढली. त्यामुळे आयुष कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.