शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी

By admin | Published: May 15, 2015 05:18 AM2015-05-15T05:18:19+5:302015-05-15T05:18:19+5:30

इंदापूर शहरातील पाटील बंगला परिसर व गणेशनगर भागात गुरुवारी (दि. १४) पहाटे दीड ते तीनच्या दरम्यान धारदार शस्त्राचा धाक दाखवून

Expose the Arms Stolen | शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी

शस्त्राचा धाक दाखवत जबरी चोरी

Next

इंदापूर : इंदापूर शहरातील पाटील बंगला परिसर व गणेशनगर भागात गुरुवारी (दि. १४) पहाटे दीड ते तीनच्या दरम्यान धारदार शस्त्राचा धाक दाखवून व जबर मारहाण करून जबरी चोरी केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेत पती-पत्नी जबर जखमी झाले आहेत. इंदापूर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनांमुळे शहराच्या वाढीव हद्दीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना गणेशनगर भागात उत्तरेश्वर शंकर लोंढे यांच्या घरी घडली. लोंढे, पत्नी व दोन मुलांसह घरी झोपले होते. पहाटे दीड ते दोनच्या सुमारास त्यांच्या स्वयंपाकघराच्या दाराचा कोयंडा कटावणीने उचकटून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी बेडरूमचे दार ठोठावले. लोंढे यांनी झोपेतच दार उघडले. त्यांना काही कळायच्या आत घरात शिरलेल्या चोरट्यांनी हातातील धारदार शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कपाटातील सामान उचकटून, दीड तोळे सोने, अठरा हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
दुसरी घटना तीनच्या सुमारास पाटील बंगला परिसरातील सोमनाथ गार्डे यांच्या बंगल्यात भाड्याने राहणाऱ्या कैलास चंद्रकांत गाडे यांच्या घरी घडली.
पहाटे तीनच्या सुमारास हातात चाकू व लाकडी दांडकी असलेल्या तीन चोरट्यांनी बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील कपाटामधील ४५ हजार रुपयांचा तीन तोळ्यांचा राणीहार,आठ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. त्यानंतर हॉलमध्ये येऊन गाडे यांना झोपेतून उठवले. काही कळायच्या आत त्यांनी गाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चाकूने कपाळ, नाक डोक्याच्या पाठीमागे वार केले. पत्नी मध्ये पडल्यानंतर तिच्या डाव्या पायावर लाकडी दांडक्याने मारण्यात आले. मंगळसूत्र हस्तगत केले. गाडे दाम्पत्य व घरी आलेल्या पाहुण्यांना बेडरूममध्ये कोंडून चोरटे निघून गेले.
या दोन्ही ही प्रकारांत चोरट्यांनी स्वयंपाकघरातून घरात प्रवेश केला. लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार चोरटे होते. त्यापैकी एकाने तोंडावर फडके बांधले होते. चौघेही मराठीत बोलत होते, असे संशय लोंढे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Expose the Arms Stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.