मॉलच्या स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 01:30 AM2018-10-14T01:30:22+5:302018-10-14T01:30:31+5:30

तीन परदेशी तरुणींची सुटका : दोघांवर गुन्हा दाखल

Expose prostitution business in Mall's spa center | मॉलच्या स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

मॉलच्या स्पा सेंटरमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

googlenewsNext

पुणे : नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉलमधील आरोह स्पा मसाज सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व हवेली पोलिसांनी छापा घालून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन परदेशी व एका परप्रांतीय तरुणीची सुटका केली़ मसाज सेंटरमालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ व्यवस्थापक टी. मावेलझुआ कपतांगा (वय २१, सध्या रा़ नांदेड सिटी, मूळ रा़ कॉन्सिल वेंग, पो़ सहा़ मिझोराम) याला अटक केली.


नांदेड सिटी डेस्टिनेशन सेंटर मॉल येथील आरोह स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पै़ विजय चौधरी यांना मिळाली़ पोलिसांनी आरोह स्पा मसाज सेंटर येथे बनावट ग्राहक पाठविला़ तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकला़ तेथील चार तरुणींची सुटका केली़ त्यात तिघी थायलंडमधील आहेत़ मसाज सेंटरचे मालक शरद नामदेव जाधव (रा़ नांदेड सिटी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.


कपतांगा याला शनिवारी न्यायालयात हजर केले़ त्याने या चार महिलांना कोठून आणले, त्यांचे इतर साथीदार कोण, याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले़ न्यायालयाने अधिक तपासासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़


दोन महिलांची सुटका
बिबवेवाडीतील एका घरामध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. घरावर टाकलेल्या छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई धुमाळ आणि शितोळे यांना याबाबत माहिती मिळाली होती. वेश्याव्यसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्या कांबळे (वय ३२, रा. बिबवेवाडी), सुधाकर जोहरे (वय २७, रा. कोंढवा), नवनाथ भगत (वय ३२, रा. आंबेगाव) आणि मधुकर यादव (वय ३९, रा. बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Expose prostitution business in Mall's spa center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.