Pune: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; कारवाई करत पोलिसांनी केली ५ पीडित महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 03:02 PM2021-12-18T15:02:06+5:302021-12-18T15:20:31+5:30
पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पाच पीडित महिलांची सुटका केली
पिंपरी: स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पाच पीडित महिलांची सुटका केली. वाकड येथे ब्लॉझम सलून शुक्रवारी (दि. १७) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
स्पा सेंटरचा चालक-मालक सचिन सुरेश भिसे (वय ३३, रा. शिराढोण, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), स्पा सेंटरची मॅनेजर मोहिनी फुलचंद घुगे/ मोहिनी लहू सोनवणे (वय २५, रा. रहाटणी), अभय मारुतीराव छिद्री (वय ४०, रा. रहाटणी, काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस कर्मचारी सोनाली माने यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन भिसे आणि मोहिनी यांनी पैशांचे आमिष दाखवून पाच पीडित महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून पीडित महिलांची सुटका केली. आरोपी अभय छिद्री याने त्याच्या नावावर असलेली जागा कोणतेही ॲग्रीमेंट न करता आरोपी सचिन आणि मोहिनी यांना उपलब्ध करून दिली. त्यांनी या जागेवर स्पा सेंटर च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू केला. वेश्या व्यवसाय साठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे जागा मालक अभय छिद्री याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.