एक्स्प्रेस-वेवरील टोल १८ टक्के वाढला; १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:37 AM2023-03-29T06:37:32+5:302023-03-29T06:37:44+5:30

सव्वातीन वर्षांत टोलवसुलीत ७०% वाढ

Express-way toll increased by 18 percent; The new rate will be applicable from April 1 | एक्स्प्रेस-वेवरील टोल १८ टक्के वाढला; १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार

एक्स्प्रेस-वेवरील टोल १८ टक्के वाढला; १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार

googlenewsNext

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहनांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. गेल्या सव्वातीन वर्षांत टोलवसुलीत ७० टक्के वाढ झाली. असे असतानाही आता त्यात १ एप्रिलपासून टोलमध्ये १८ टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार असल्याने खासगी बस असोसिएशनने बसभाड्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्याच वेळी हा टोल रद्द करावा, यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत आहे. त्यामुळे एका बाजूला वाहतूक कोंडीत वाहनांचा वेळ जात असतानाच आता त्यात टोलधाडीचा मारा पडणार आहे. एक्स्प्रेस हायवे सुरू झाल्यानंतर त्यावरून वाहने न जाता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जातात. त्यामुळे दोन्ही महामार्गांचे काम २००४ मध्ये ‘आयआरबी’कडे १५ वर्षांच्या कराराने देण्यात आले होते. त्यानुसार ही मुदत संपण्यापूर्वीच २०१६ पर्यंत खर्च झालेली सुमारे २ हजार ७०० कोटी रुपये वसूल झाली होती. असे असतानाही हा टोल सुरू ठेवण्यात आला. त्यात खंडाळा-खोपोली लिंक रोडच्या कामाचा समावेश करून आता पुन्हा या टोलधाडीचा कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे. या करारातील अनेक बाबींचे कंत्राटदार कंपनीकडून उल्लंघन वेळोवेळी झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. मात्र, या करारातील एका मुद्द्याचा आधार घेऊन दर ३ वर्षांनी टोलच्या रकमेत वाढ केली जाते.

एक्स्प्रेस-वेवर सप्टेंबर २०१९मध्ये दरमहा ६० कोटी रुपये टोल वसूल केला जात होता. तो जानेवारी २०२३मध्ये दरमहा १०२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०१९मध्ये या महामार्गावरून दरमहा १० लाख ७३ हजार कार धावत होत्या. आता जानेवारी २०२३मध्ये त्यांची संख्या १३ लाखांहून अधिक आहे. अन्य वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

टोल न भरणारी दीड लाख वाहने
टोल न भरता वाहनांना या महामार्गावरून जाणे अशक्य आहे. असे असताना दरमहा या महामार्गावरून दीड लाख वाहने टोल न भरता जातात, अशी कोणालाही न पटणारी आकडेवारी टोल कंपनीकडून वर्षानुवर्षे दाखविली जात आहे. त्यात अगदी मोठी थ्री एक्सएल वाहनांची संख्या १,८००हून अधिक दाखविली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या सव्वातीन वर्षांत मासिक टोलवसुलीमध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. तरीही, १ एप्रिलपासून टोलदरात १८ टक्क्यांनी दरवाढ करण्यात येणार आहे. ही दरवाढ किती अनावश्यक आणि नागरिकांच्या खिशावर डल्ला मारणारी आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

वाहन     आताचे दर     १ एप्रिलपासून 
चारचाकी     २७०     ३२० 
टेम्पो     ४२०     ४९५ 
ट्रक     ५८०     ६५८ 
बस     ७९७     ९४० 
थ्री एक्सएल     १,३८०     १,६३०
एम एक्सएल     १,८३५     २,१६५

Web Title: Express-way toll increased by 18 percent; The new rate will be applicable from April 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.