मिळकतकरात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबर पर्यंत वाढवा

By राजू हिंगे | Published: October 30, 2023 02:32 PM2023-10-30T14:32:54+5:302023-10-30T14:33:11+5:30

पुणे महापालिकेकडून केवळ निवासी मिळकतींना स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम करण्यात आली आहे

Extend the deadline for filing the application for 40 percent exemption in income tax till December 20 | मिळकतकरात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबर पर्यंत वाढवा

मिळकतकरात ४० टक्के सवलतीचा अर्ज भरण्याची मुदत २० डिसेंबर पर्यंत वाढवा

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत करातील ४० टक्के सवलतीसाठी पीटी ३ फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. हा अर्ज भरून देण्याची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे ही मुदत २० डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी माजी नगरसेवक आणि विविध सामाजिक संस्थानी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुणे महापालिकेकडून केवळ निवासी मिळकतींना स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४० टक्के सवलत न देता १ एप्रिल २०१९ पासून पुढे झालेली आहे. त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४० टक्के सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत १ एप्रिल२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे. त्या मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४० टक्के सवलतीचा लाभ १ एप्रिल२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे. या सर्व मिळकतींना ४० टक्के सवलतीचा लाभ १ एप्रिल २०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे सादर करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या मिळकत करातील ४० टक्के सवलतीसाठी पीटी ३ फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. हा अर्ज भरून देण्याची मुदत १५ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे ही मुदत २० डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी आणि नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Extend the deadline for filing the application for 40 percent exemption in income tax till December 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.