पदवी प्रमाणपत्राच्या अर्जासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:52+5:302020-12-29T04:09:52+5:30
पुणे विद्यापीठातर्फे येत्या मार्च-एप्रिल २०२१ मध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी पदवी व पदव्युत्तर ...
पुणे विद्यापीठातर्फे येत्या मार्च-एप्रिल २०२१ मध्ये पदवी प्रदान समारंभ आयोजित केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावेत,असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले. विद्यापीठाने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह तर विलंब शुल्कासह अर्ज करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन निकाल जाहीर केले आहेत. परंतु, अद्याप विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्या नाहीत. पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन गुणपत्रिका ग्राह्य धरली जात नाही, त्यासाठी गुणपत्रिकेची हार्डकॉपी स्कॅन करून अपलोड करावी लागते. त्यामुळे विद्यापीठाने अर्ज भरण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत व विलंब शुल्कासह अर्ज करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.