बाणेर कोविड हॉस्पिटलच्या ठेकेदार एजन्सीला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:12 AM2021-03-17T04:12:10+5:302021-03-17T04:12:10+5:30
या एजन्सीसोबत केलेला करारनामा ८ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. सद्यस्थितीमध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत. तर, ...
या एजन्सीसोबत केलेला करारनामा ८ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. सद्यस्थितीमध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत. तर, भविष्यातही या रुग्णालयाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने एजन्सीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला होता.
यासोबतच पालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये आणि कोविड सेंटरकरिता वैद्यकीय साधनसामुग्रीची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जवळपास १५ ठेकेदारांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता. यातील दोन कंपन्या अपात्र ठरल्या. उर्वरीत तेरा कंपन्या पात्र ठरल्या. तब्बल दोन कोटी रुपयांची खरेदी केली जाणार आहे. पात्र निविदाधारकांकडून ही खरेदी करण्यास तसेच आवश्यक करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यासोबतच डॉ. नायडू रुग्णालयासाठी २९ लाख ७८ हजार रुपयांचे एक्स-रे मशीन खरेदी करण्यासही मान्यता दिली.
महापालिकेच्या विविध रुग्णालयांमधील प्रसुतीगृहे, दवाखाने, कोविड केअर सेंटरमधील इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांची वार्षिक देखभाल दुरुस्ती करण्यासाठीच्या ४५ लाख रुपयांच्या या प्रस्तावालाही मान्यता दिली.
=====
पालिका खरेदी करणार रुग्णवाहिका
पालिका पाच शववाहिका आणि दोन रुग्णवाहिका खरेदी करणार आहे. महापौर निधीमधून खरेदी केल्या जाणाऱ्या या पाच शववाहिकांसाठी ७५ लाख रुपये तर ३० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.
=====
कोरोना काळात आरोग्य विभागासाठी तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात आलेल्या वैद्यकीय मनुष्यबळाला एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा ४४ दिवसांची मुदतवाढ देणार आहे. औषध निर्माता (२), परिचारिका (१७), आरोग्य निरीक्षक (२५), निरीक्षक (१९), सहाय्यक दवाखाना (१८), परिचारक/नर्सिंग ऑर्डर्ली (१३), आया (२३) अशा एकूण ११७ पदांना मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.