तंत्रशिक्षण विभागाचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:16+5:302021-05-24T04:11:16+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा विचार करता मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याची मागणी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा विचार करता मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याची मागणी संस्थांकडून करण्यात आली होती. त्याचा विचार करून दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी सांगितले.
तंत्रशिक्षण विभागाच्या उन्हाळी परीक्षेसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता पुन्हा मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अधिक अवधी मिळाला आहे. विद्यार्थ्यांना येत्या २६ ते ३० मे या कालावधीत अर्ज करता येईल. तसेच याच कालावधीत संस्थास्तरावर अर्ज निश्चित करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित संस्था व विभागीय कार्यालयांनी कार्यवाही करावी. संस्थेकडून उन्हाळी परीक्षेचे अर्ज निश्चित न झाल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित संस्था जबाबदार राहील, असेही डॉ. चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.