एमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:15 PM2018-01-18T15:15:35+5:302018-01-18T15:18:06+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१८’ या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Extension of filing of MPSC application; Online application form can be filled till 22nd January | एमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज

एमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्याकडे ई-मेल द्वारे केली होती तक्रारमुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मानले आयोगाचे आभार

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१८’ या परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरण्यास चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या २२ जानेवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१८ या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास १८ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेचे शुल्क भरूनही त्यांचे चलन बँकेत स्वीकारले जात नव्हते. त्याचप्रमाणे प्रथमच अर्जात उप-जात भरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. उप-जात भरतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्याकडे ई-मेल द्वारे याबाबत तक्रार केली होती. मात्र, विद्यार्थ्यांना त्याचे उत्तर पाठविले जात नव्हते. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आयोगाने अर्ज भरण्यास आणखी चार दिवस मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये २३ जानेवारीपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरावे लागतील. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काच परतावाही केला जाणार नाही, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी महेश बढे, किरण निंभोरे,अविनाश वाघमारे, सुवर्णकार विजयालक्ष्मी आदी विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने आयोगाचे आभार मानले आहेत.

Web Title: Extension of filing of MPSC application; Online application form can be filled till 22nd January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.