खासगीरीत्या बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:18 AM2021-02-21T04:18:19+5:302021-02-21T04:18:19+5:30
खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्रासाठी ठराविक मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या आणि प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेल्या ...
खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्रासाठी ठराविक मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या आणि प्रमाणपत्रासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे २५ जानेवारी २०२१ पासून ई-मेलवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:चे नावनोंदणी प्रमाणपत्र
http://form 17.mh-hsc.ac.in व http://form 17.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर घ्यावीत. तसेच नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी नियमित शुल्काने २५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत परीक्षा अर्ज भरण्यास मुदत दिली होती.परंतु, आता पुन्हा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत, तर १ मार्च ते ७ मार्च या कालावधीत विलंब शुल्कासह http://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्ज भरता येतील.
--------------