पुणे विद्यापीठाच्या यूजी, पीजी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्जास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:51 AM2024-05-11T11:51:05+5:302024-05-11T11:51:26+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येते. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध पदवी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेण्यात येते. प्रवेश परीक्षेला ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना दि. २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या विविध विभाग, केंद्र आणि प्रशाळांमध्ये विविध ९१ एकात्मिक तसेच आंतरविद्याशाखीय पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविले जातात. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेला अर्ज करण्यासाठी मागील महिन्यांत दि. २० एप्रिल राेजी सुरुवात झाली हाेती. तसेच दि. १० मेपर्यंत मुदत दिली हाेती. विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे कुलसचिव डाॅ. मुंजाजी रासवे यांनी शुक्रवारी पुन्हा १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना येत्या २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया याबाबत https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx य संंकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.