आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:44+5:302021-02-16T04:13:44+5:30
सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित ...
सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जातात. गेल्या वर्षी राज्यात सुमारे १ लाख १५ हजार जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली. मात्र, यंदा केवळ ९० हजार जागांसाठीच शाळांकडून नोंदणी केली आहे. त्यामुळे शाळांना नोंदणी करण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील सर्व शाळांसह पुणे जिल्ह्यातील शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातील. जिल्ह्यातील ९६५ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १४ हजार ४५४ जागांवर प्रवेश देणे शक्य होणार आहे. परंतु, त्यात आणखी काही जागांची वाढ होऊ शकते, असे प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.