ग्रामसभा घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी : बांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:09 AM2021-03-20T04:09:42+5:302021-03-20T04:09:42+5:30
राज्यातील सहकारी संस्थांच्या मागणीवरून सहकार विभागाने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी पुढील वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र कोरोनाचा ...
राज्यातील सहकारी संस्थांच्या मागणीवरून सहकार विभागाने वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी पुढील वर्षीच्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र कोरोनाचा कहर कमी होण्याची चिन्हे नसल्याने आगामी मार्चपर्यंत तरी वार्षिक सभा कशा घ्यायच्या, असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर असताना अशा अडचणीच्या काळात ऑनलाइन पद्धतीने सर्वसाधारण वार्षिक सभा घेण्याचा एक पर्याय पुढे आल्याने सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा यावर्षी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. गावोगावच्या विकासासाठी ग्रामसभा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कोविडमुळे वर्षभर संपूर्ण राज्यात ग्रामसभा घेण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने गावांच्या विकासाचा राजमार्ग थांबला होता. नुकताच आपल्या कार्यालयामार्फत "आमचा गाव, आमचा विकास" या धोरणानुसार गावांचे विकास आराखडे मंजूर करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ग्रामसभा घेण्याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदेश पारित करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे काही निर्बंध लावले असल्याने ग्रामसभा घेणे शक्य नाही. त्यामुळे गावोगावच्या ग्रामसभा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी सचिन बांगर यांनी केली आहे.