डीबीटी लाभार्थ्यांसाठी कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 07:35 PM2018-09-20T19:35:23+5:302018-09-20T19:50:19+5:30

अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी व प्रत्येक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लाभार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

Extension of submission of documents for DBT beneficiaries | डीबीटी लाभार्थ्यांसाठी कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

डीबीटी लाभार्थ्यांसाठी कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

Next
ठळक मुद्देसदस्यांची मागणी मान्य : जिल्ह्यातून ३२५३ अर्ज दाखल ; ८६४ अर्ज ठरले अपात्रअपात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत मुदतयंदा शेवई मशीन, ब्युटी पार्लरचे साहित्य आणि शेळी पालनाचा लाभ देणार

पुणे : जिल्हा परिषदेच्या वैयक्तीच्या लाभाच्या योजने (डीबीटी) चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून ३ हजार २५३ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ८६४ अर्ज अपात्र ठरले आहेत. या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी व प्रत्येक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लाभार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्याबाबत संबधित तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली. 
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही काही सदस्यांनी लाभार्थ्यांना कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ द्यावी, उत्पन्नाचा दाखला मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळावा, कोणीही लाभापासून वंचित राहू नये या उद्देशाने जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार ही मुदतवाढ कागदपत्रे सादर करण्यासाठी असून, नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे दीपक चाटे यांनी सांगितले.
जिल्ह्यातून तब्बल ३ हजार २५४ लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. त्यातील २ हजार ३९० अर्ज पात्र ठरले असून, ८६४ अर्ज अपात्र ठरले आहेत. या अपात्र अर्जात कागदपत्रांच्या त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. यंदा शेवई मशीन, ब्युटी पार्लरचे साहित्य आणि शेळी पालनाचा लाभ देणार आहे.

Web Title: Extension of submission of documents for DBT beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.