विद्यापीठ प्रवेश अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:58+5:302021-07-04T04:08:58+5:30
विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची प्रवेश परीक्षा घेतली ...
विद्यापीठात विविध विभागात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठातील विभागात प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थी सुद्धा प्रयत्न करतात. परदेशी विद्यार्थ्यांनासुद्धा विद्यापीठातील प्रवेशाचे आकर्षण असते. विद्यापीठाने ४ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दिली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार विद्यापीठाने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.
------
विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १० जुलैपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर विलंब शुल्कासह १५ जुलैपर्यंत विद्यार्थी करू शकतील. मात्र, त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.