दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास २२ मेपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:11 AM2021-05-12T04:11:25+5:302021-05-12T04:11:25+5:30

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता दिलेली मुदत वाढविली आहे. आता ...

Extension till May 22 for students of 10th and 12th classes to apply for scholarships | दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास २२ मेपर्यंत मुदतवाढ

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास २२ मेपर्यंत मुदतवाढ

Next

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता दिलेली मुदत वाढविली आहे. आता २२ मेपर्यंत विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेतल्या नाहीत. हे लक्षात घेऊन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ जो निर्णय घेईल. त्या अनुषंगाने स्थायी समितीची मान्यता घेऊन, यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या शिष्यवृत्ती बद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्यावतीने इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अर्थसहाय्य योजनेतंर्गत विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा देखील याकरिता ऑनलाईनच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांनी ‘ ुि३.स्रि४ल्लीूङ्म१स्रङ्म१ं३्रङ्मल्ल. ड१ॅ ’ या संकेतस्थळावर अर्ज करावा़

पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपा हद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावीमध्ये ८० टक्के गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी तसेच ७० टक्के गुण मिळवले पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय ६५ टक्के गुण मिळवणारे तथापि ४० टक्के अपंगत्व असलेले विद्यार्थी यांना १५ हजार रूपये दिले जातात़ तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे़

---

शिष्यवृत्ती वाटप व लाभार्थी विद्यार्थी

वर्ष. दहावी बारावी कोटी

२०१७/१८ ७११६ २४९२ २१़ ००

२०१८/१९ ८६६९ ३४८७ २१़ २०

२०१९/२० ६०२० २४२० १५़ ८

२०२०/२१ ७५२६ २६४० १७.८८

Web Title: Extension till May 22 for students of 10th and 12th classes to apply for scholarships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.