अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:26 PM2018-02-23T14:26:00+5:302018-02-23T14:29:21+5:30

आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी, असे मत डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.

Extensive movement of organ transplantation should be developed : Vilas Chaphekar | अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर

अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर

Next
ठळक मुद्दे१० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित अवयवदान प्रसार अभियानाचा समारोपग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा : चाफेकर

पुणे : आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी. त्यासाठी अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.
वंचित विकास, शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट व हॅन्डरायटिंग अ‍ॅनालिसिस रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या वतीने १० ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान प्रसार अभियानाचा समारोप डॉ. चाफेकर यांच्या उपस्थित सारसबाग गणपती मंदिराच्या परिसरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अभियानाचे प्रमुख डॉ. मधुसूदन घाणेकर, वंचित विकासच्या मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर डॉ. सुधीर कुलाल, विजय दामले आदी उपस्थित होते.
डॉ. चाफेकर म्हणाले, ‘ग्रॅफॉलॉजीच्या माध्यमातून अवयवदान प्रसाराचा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यावेळी पुण्याच्या विविध भागात फिरून अवयवदानाचे महत्त्व सांगण्यात आले. यातून हजारो लोकांपर्यंत त्यांनी अवयवदानाचा संदेश पोहोचवला आहे. प्रत्येकाने अवयदानाचा गांभीर्याने विचार केल्यास अनेकांना नव्याने आयुष्य जगात येईल. आपले अस्तित्व इतरांच्या रूपाने कायम राहील.’
डॉ. घाणेकर म्हणाले, ‘अवयवदानाबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी प्रसार होणे गरजेचे आहे. या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी अवयवदानात योगदान दिले आहे, अशा व्यक्तींच्या वारसांचा सन्मान केला पाहिजे. येत्या काळात याबाबत परिषद भरवून त्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न आहे.’
मीना कुर्लेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर कुलाल यांनी आभार मानले. 

Web Title: Extensive movement of organ transplantation should be developed : Vilas Chaphekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.