बाह्यवळणाचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:38 AM2017-08-06T04:38:55+5:302017-08-06T04:38:55+5:30
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई
राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शहराच्या बाह्यवळणाबाबत तिढा सुटला असून जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही शेतकºयांच्या सात-बारा अडचणींमुळे नुकसानभरपाई देण्यात वेळ जात आहे. रस्त्याच्या कामात अडथळा नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. १३ धनाजी पाटील यांनी दिली.
बाह्यवळणबाधित शेतकºयांची बैठक शनिवारी खेड पंचायत समितीच्या सभागृहात झाली. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिक कदम, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सागर पाटोळे, लक्ष्मण कोकणे, मच्छिंद्र राक्षे, भास्कर जगदाळे, निवृत्ती होले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजगुरुनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे भांबुरवाडी व राक्षेवाडी या गावातील १०१ शेतकºयांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित होणार आहे. चांडोली येथे संभाव्य बिनशेती क्षेत्राच्या गुंठ्याला ७ लाख ४७ हजार रुपये व खरेदी-विक्री व्यवहारानुसार ठरलेल्या क्षेत्रातील गुंठ्याला ५ लाख ४६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. राजगुरुनगरला प्रतिगुंठा ४ लाख ५८ हजार रुपये, तर ढोरेभांबुरवाडी, राक्षेवाडी, होलेवाडी या गावांमध्ये प्रतिगुंठा ४ लाख ४३ हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार
आहे. संपादनाची घोषणा झाल्यापासून आतापर्यंत १२ टक्के व्याजाने ही रककम शेतकºयांना दिली जाणार आहे.
७/१२ तील गुंतागुंती : भरपाई मिळण्यास अडचणी
७/१२ तील गुंतागुंत आणि प्रलंबित नोंदी यामुळे नुकसानभरपाई घेण्यात शेतकºयांना अडचणी येत आहेत. काही शेतकºयांना नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकºयांनी सात-बारा उतारे व त्यामध्ये असणाºया त्रुटींमुळे शेतकºयांना नुकसानीचा मोबदला मिळण्यास अडचणी येत असल्याने भूसंपादन विभागाने ही बैठक बोलावली होती. फाळणी बारा न झाल्याने ७/१२ वर पूर्वीचे खातेदार आहेत. वहिवाट अनेक वर्षांची असली तरी नुकसानभरपाईला त्यामुळे अडचणी येत आहेत. सामाईक क्षेत्राबाबतही शेतकºयांमध्ये वादविवाद होत आहेत.
पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण कामातील राजगुरुनगर बाह्यवळण क्षेत्रात संपादित होणाºया जमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. या वेळी अडचण असलेल्या शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न पाटील यांच्याकडून करण्यात आला.
तडजोड होऊ न शकणाºया, तसेच वादविवाद असलेल्या अनेक शेतकºयांना पुढील सुनावणीसाठी पुण्यातील कार्यालयात पुराव्यासह
उपस्थित राहावे, असे अधिकाºयांनी बाधित शेतकºयांना सांगितले.