Pune Crime: पार्टटाइम जॉबच्या नावाखाली पाच लाखांचा गंडा, शिवणे परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: October 12, 2023 04:44 PM2023-10-12T16:44:03+5:302023-10-12T16:46:29+5:30
याबाबत शिवणे परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि. ११) फिर्याद दिली आहे....
पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली आहे. याबाबत शिवणे परिसरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि. ११) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून २०२३ ते ११ ऑकटोबर २०२३ दरम्यान घडला आहे. यांनी पोलिसात फिर्यादी दिली. फिर्यादीत म्हटल्यानुसार तक्रारदार यांना अनोळखी क्रमांकावरून पार्टटाइम नोकरी करण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले.
सुरूवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणाकडून ४ लाख ९५ हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात नफ्याचे पैसे काढायला गेल्यावर पैसे निघत नाहीत, असे तरुणाच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तक्रारदार यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तत्काळ उत्तमनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात टेलिग्राम आयडीधारकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शेख करत आहेत.