सोशल मीडियावर बदनामीच्या धमकीने रिल्सस्टार गोल्डन बॉयकडून उकळली लाखोंची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:17 AM2023-08-31T10:17:31+5:302023-08-31T10:17:51+5:30

गोल्डन बॉयने १८ तोळे वजनाची सोन्याची चैन घालून रिल्स तयार केले होते

Extortion of Lakhs Extorted from Reelsstar Golden Boy by Threat of Defamation on Social Media | सोशल मीडियावर बदनामीच्या धमकीने रिल्सस्टार गोल्डन बॉयकडून उकळली लाखोंची खंडणी

सोशल मीडियावर बदनामीच्या धमकीने रिल्सस्टार गोल्डन बॉयकडून उकळली लाखोंची खंडणी

googlenewsNext

किरण शिंदे

पुणे : इंस्टाग्रामवर गोल्डन बॉय या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका रिल्स स्टारला स्वतःला चोर म्हणून घेणाऱ्या एकाने चांगलाच गंडा घातला. या रील्स स्टारची 18 तोळे वजनाची सोन्याची चैन घालण्यासाठी घेतली. मात्र ही चैन परत मागितली असता आरोपीने तू लई मोठा रिल्सस्टार आहेस ना, कशी तुझी सगळी हवा काढतो असे म्हणून त्याच्याकडून तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी उकळली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरुळी कांचन येथील शिंदवणे येथे हा संपूर्ण प्रकार घडला. 

याप्रकरणी महेश उर्फ मल्लाप्पा साहेबांना होस्मानी (शिंदवणे, ता. हवेली, जी, पुणे) त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिल्सस्टार धर्मेंद्र उर्फ मोनू बाळासाहेब बडेकर (वय 30) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रील्स स्टार आहे. Instagram वर त्यांचे साडेचार लाख फॉलोवर्स आहेत. तर आरोपी हा त्यांच्या ओळखीचा आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने फिर्यादी यांची 18 तोळे वजनाची सोन्याची चैन स्वतः घालण्यास घेतली होती. काही दिवसांनी फिर्यादी यांनी ही चैन परत मागितली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली आणि मी अट्टल चोर असून चोरी केलेले सर्व सोने तुला देत असतो असे कोंढवा पोलिसांना सांगेल. " तू लई मोठा रील स्टार आहेस ना, आता बघ मी कशी तुझी सगळी हवा काढतो, तू मला तीन लाख रुपये दे, नाहीतर मी तुझी सोशल मीडियावर बदनामी करेल, चोरी केलेले सोने तुला देतो असे सांगून सोशल मीडियावर तुझी बदनामी करेल मग तुझ्या फॉलोवर्सला कळेल तू कसा गोल्डन बॉय झाला आहेस ते" असे म्हणून आरोपीने फिर्यादीकडे तीन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. 

फिर्यादीने यातील दोन लाख रुपये आरोपीला दिले सुद्धा होते. मात्र आणखी पैशाची मागणी करत आरोपीने सोशल मीडियावर फिर्यादीची बदनामी केली आहे.. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Extortion of Lakhs Extorted from Reelsstar Golden Boy by Threat of Defamation on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.