निर्धारातून घडते लोकोत्तर कार्य
By admin | Published: April 1, 2017 02:29 AM2017-04-01T02:29:08+5:302017-04-01T02:29:08+5:30
‘देणे हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. समाजासाठी काही तरी करणे, ही माणसाची उपजतबुद्धी असते
पुणे : ‘देणे हा मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक आहे. समाजासाठी काही तरी करणे, ही माणसाची उपजतबुद्धी असते. पण, आपण
केवळ एकटे काय करू शकणार,
असा प्रश्न लोकांना भेडसावत असतो. मात्र, एखादी व्यक्ती निर्धार करून खंबीरपणे उभी राहते, तेव्हाच तिच्याकडून लोकोत्तर कार्य घडू शकते, असे मत सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेच्या पुण्यातील स्नेहाधार शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भगिनी निवेदिता बँकेच्या संस्थापक मीनाक्षी दाढे आणि ‘देणे समाजाचे’ या
उपक्रमाद्वारे प्रदर्शनाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांचे कार्य नागरिकांसमोर आणणाऱ्या वीणा गोखले यांना डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते स्नेहाधार गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी स्रेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी व कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापनतज्ज्ञ प्रकाश आपटे, स्नेहाधारच्या प्रकल्प संचालक शुभांगी कोपरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)