पुणे महापालिकेची तुटपूंजी तरतूद

By admin | Published: January 11, 2016 01:42 AM2016-01-11T01:42:33+5:302016-01-11T01:42:33+5:30

महापालिकेच्या आगामी २०१६-१७ च्या अंदाजपत्रकातील ‘सहभागी अंदाजपत्रक’ योजनेमध्ये यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन त्यांना आवश्यक वाटणाऱ्या कामांची

Extraction of Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेची तुटपूंजी तरतूद

पुणे महापालिकेची तुटपूंजी तरतूद

Next

पुणे : महापालिकेच्या आगामी २०१६-१७ च्या अंदाजपत्रकातील ‘सहभागी अंदाजपत्रक’ योजनेमध्ये यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन त्यांना आवश्यक वाटणाऱ्या कामांची यादी क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपविली आहे. मात्र, ४ हजार कोटींचे अंदाजपत्रक बनविणाऱ्या पुणे महापालिकेची नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी केवळ ३८ कोटी रुपयांचीच तर तरतूद असल्याने नागरिकांच्या उत्साही सहभागावर पाणी पडण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये २००६ पासून सहभागी अंदाजपत्रकाची संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या प्रभागातील कोणत्या समस्या प्राधान्याने सोडविल्या गेल्या पाहिजेत, त्याकरिता कोणती कामे झाली पाहिजेत, हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची संधी याद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या प्रभागातील ड्रेनेज, रस्ते, पाणी, रस्त्यावरील दिवे यासह अनेक आवश्यक कामे सुचविण्याची संधी यातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी २०१६-१७च्या अंदाजपत्रकातील सहभागी अंदाजपत्रक योजनेमध्ये कामे सुचविण्यासाठी ३१ सप्टेंबर २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. नागरिकांनी त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद देत त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुचविली आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून या कामांची छाननी करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. याचा सविस्तर अहवाल तयार करून आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
सहभागी अंदाजपत्रक योजनेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता जनवाणी, सीईई या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जात असलेल्या प्रयत्नांमुळे सहभागाचा टक्का वाढत चालला आहे. यंदाच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकासाठी ६ हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या सूचना, शिफारशी महापालिकेकडे केल्या होत्या. नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्यासाठीची तरतूद मात्र केवळ ३८ कोटी रुपये इतकीच आहे. वस्तुत: महापालिकेचे अंदाजपत्रक १५०० कोटी रुपयांवरून ४ हजार कोटींचा टप्पा गाठत असताना नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठीही वाढ अपेक्षित होती. मात्र, नगरसेवकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यामध्ये वाढ झालेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Extraction of Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.