उसाचा तोडा लांबला

By admin | Published: December 29, 2014 12:53 AM2014-12-29T00:53:22+5:302014-12-29T00:53:22+5:30

मावळ तालुक्यात उसाचा तोडा लांबला आहे. तोडणीस उशीर झाल्याने वजन कमी होवूून तसेच, अनेक कारणांमुळे उस उत्पादन घटण्याच्या

Extraction of sugarcane | उसाचा तोडा लांबला

उसाचा तोडा लांबला

Next

पिंपरी : मावळ तालुक्यात उसाचा तोडा लांबला आहे. तोडणीस उशीर झाल्याने वजन कमी होवूून तसेच, अनेक कारणांमुळे उस उत्पादन घटण्याच्या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. होणारे नुकसान भरून काढण्यासाठी कोणाकडे पहावे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतमजूरांच्या कमतरतेमुळे तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी तरकारी पिक लागवडीखालील क्षेत्र कमी केले. या वर्षी ऊस लागवडीखालील क्षेत्र ७ हजार ६७० हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्यातून कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यास साडेपाच लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला आहे. या उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांकडून ढासळत असल्याचा प्रत्यय येत आहे. काही शेतकऱ्यांचा ऊस तुटण्याची तारीख उलटून दीड महिना झाला. तरी अद्याप तोडणी झालेली नाही.
जवळीक असणारे सुखी
आपलाच ऊस तोडावा म्हणून अनेक शेतकरी सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांपैकी काही शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात आहे. याचबरोबर ज्या धनाढ्य शेतकऱ्यांची व्यवस्थापनाशी जवळीक आहे, अशांच्याच शेतामधील ऊसाची तोडणी लवकर केली जाते. आमच्या शेतामधील ऊस दीड ते दोन महिने होऊनही तोडला जात नाही. विशेषत: उन्हाळ्यापर्यंत उशीर झाल्यास उसाला तुरे येतात. गाभ्याचा भाग पोकळ होवून २० टक्क्यांपर्यंत वजन घटते. त्यामुळे नुकसान होत असल्याची कैफियत शेतकरी मांडत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Extraction of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.