पाण्याच्या पातळीत कमालीची घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:53 PM2018-11-15T22:53:23+5:302018-11-15T22:53:57+5:30

दुष्काळसदृश स्थिती : शेततळी पडली कोरडी

Extreme reduction in water level | पाण्याच्या पातळीत कमालीची घट

पाण्याच्या पातळीत कमालीची घट

Next

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. शेततळ्याला कोरड पडल्याने चौफेर दुष्काळाचे सावट पसरले आहे. दोन वर्षांपासून जिरायती भागातील खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामही वाया गेला आहे.
इंदापूर तालुक्यात पावसाळा संपला. हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरीही नदी, नाले, ओढे कोरडे पडलेले दिसत आहेत. दोन वर्षांपासून ओढ्याला पाणीच आले नसल्यामुळे विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे.

जनावरांसाठी हिरवा चारा
जून महिन्यात सुरुवातीला जोरदार पावसाचे आगमन झालेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. जनावरांसाठी हिरवा चारा मिळविण्यासाठी शेतकºयांवर दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात तीन सहकारी साखर कारखान्यांना सुरूवात झाली असल्यामुळे ऊस व वाड्याच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. सध्या कडब्याच्या एका पेंडीला ३५ रुपये दर आहे.

Web Title: Extreme reduction in water level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.