विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:39 PM2018-07-21T21:39:57+5:302018-07-21T21:42:39+5:30
येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
पुणे : कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़. येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील जव्हार १५०, मोखेडा ११०, माथेरान, विक्रमगड ९०, कर्जत ८०, खालापूर ७०, कणकवली, तलासरी, वाल्पोई, वाडा ६०, दापोली, पेण, फोंडा, राजापूर ५०, भिवंडी, चिपळूण, दाभोलिम, खेड, म्हसळा, पोलादपूर, रोहा, वैभववाडी ४० मिमी पावसाची नोंद झाली होती़ .
मध्य महाराष्ट्रात अक्कलकुवा १००, महाबळेश्वर ८०, इगतपुरी, पेठ ७०, ओझरखेडा ६०, हरसूल, नवापूर, राधानगरी, सुरगाणा, तळोदा ५० मिमी पाऊस पडला़ याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़.
मराठवाड्यातील धनसावंगी, मुखेड ३०, अर्धापूर, विल्लोली, पूर्णा, सेलू, वासमत २०, औंढा नागनाथ, भोकरदन, दिगलूर, जाफ्राबाद, जालना, कन्नड, नांदेड, निलंगा, परभणी परतूर, पाथरी १० मिमी पाऊस पडला़.
विदर्भात भामरागड ४०, अहिरी सिरोंचा ३०, मौदा २० मिमी पाऊस पडला होता़. घाटमाथ्यावरील अम्बोणे १५०, शिरगाव, कोयना, लोणावळा, दावडी, ताम्हिणी १३०, वळवण १००, डुंगरवाडी ९०, खोपोली ८०, भिरा ७०, शिरोटा, भिवपूरी ५० मिमी पावसाची नोंद झाली होती़ .
शनिवारी दिवसभरात नागपूर येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली असून राज्यात काही ठिकाणी हलक्या सरी आल्या होत्या़.
येत्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. कोकण, गोव्यात जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
२३ जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २४ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .