रोटरीने केलेली सुविधा गौरवास्पद : बेनके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:38+5:302021-04-17T04:09:38+5:30
वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आतापर्यंत १२ हजार नागरिकांना लसीकरण देण्यात आले आहे. ...
वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आतापर्यंत १२ हजार नागरिकांना लसीकरण देण्यात आले आहे. सुरूवातीला आरोग्य केंद्रातील पहिल्या मजल्यावरील हाॅलमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या मजल्यावर जाणे अशक्य होत असल्याने नागरिकांसाठी आरोग्य केंद्रातील मोकळ्या जागेत नेटशेड उभारून तसेच १०० खुर्च्या देऊन उपक्रम राबविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नारायणगाव आणि विद्या डेकोरेटर्स यांचे कौतुक करून सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अतुल बेनके यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. शेताली कामोने, डॉ. अभा त्रिपाटी, युवा नेते अमित बेनके, रोटरीचे अध्यक्ष सचिन घोडेकर, राजेंद्र बोरा, योगेश भिडे, प्रशांत ब्रम्हे, माऊली लोखंडे, हेमंत महाजन, ब्रजेष बंदील, विदया डेकोरेटर्सचे भावेश डोंगरे , आरोग्य सहाय्यक गुंजकर, मुळे आदी उपस्थित होते.
बेनके यांनी भाषणात, कोरोनाकाळात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटरीचे अध्यक्ष सचिन घोडेकर यांचेही कौतुक केले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष सचिन घोडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रोटरी क्लब मार्फत कोरोनाकाळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
१६ नारायणगाव
रोटरीने नेटशेड उभारून १०० खुर्च्या उपलब्ध करून दिल्या. त्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे हस्तांतरण करताना अतुल बेनके, सचिन घोडेकर व पदाधिकारी.