डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:16 PM2019-06-03T15:16:18+5:302019-06-03T15:23:45+5:30

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत राज्यातील विविध डाॅक्टरांचा समावेश आहे.

fact finding committee appointed in dr. payal tadwi suicide case | डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना

डाॅ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सत्यशाेधक समितीची स्थापना

googlenewsNext

पुणे :  मुंबईतील बीवायएल नायर रुग्णालयातील तरुण निवासी डॉक्टरीपायल तडवी यांच्या दुर्देवी आत्महत्येची पार्श्वभूमी व महत्त्वाचे घटक यांचे मूल्यमापन करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायामध्ये सामाजिक व श्रेणीय पैलू निर्माण करण्याचा एकत्रित प्रयत्न म्हणून, इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) सत्यशोधक मोहीम समितीची स्थापना करण्यत आली आहे.

निवासी डॉक्टरांवर व प्रामुख्याने सरकारी रुग्णायांतील निवासी डॉक्टरांवर कामाचा कमालीचा ताण असतो आणि त्यामुळे त्यांना नैराश्य येते, ही बाब
सर्वांना माहीत आहे. संबंधित प्रकरणात, जातीय भेदभाव व कलंक हे आरोप करण्यात आले आहेत. जर हे खरे असेल तर हा फार गंभीर विषय आहे व त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसायाने जात, धर्म व राजकारण या अडळ्यांवर केव्हाच मात केली आहे. वैद्यकीय समुदायात किंवा रुग्णांमध्येकोणत्याही बाबतीत भेदभाव केला जात नाही. परंतु, या अलिखित नियमामध्ये, वैयक्तिक हेवेदावे व वर्तन निर्माण होऊ शकते. आयएमए भेदभाव करणा-या कोणत्याही वर्तनाकडे कानाडोळा करत नाही.

डॉक्टरांना ज्या हालाखीच्या स्थिती काम करावे लागते ती स्थिती व विशेषत: सरकारी रुग्णालयांतील राहण्याची व्यवस्था, त्यांच्याकडून नेहमीच लादला जाणारा कामाचा असाधारण ताण आणि क्लिनिकल कौशल्यांच्या अभावाबद्दल नेहमी केला जाणारा उपहास, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.आयएमए सत्यशोधक समिती हा क्लिष्ट विषय बारकाईने अभ्यासणार आहे आणि एका आठवड्यामध्ये समितीने आयएमए राष्ट्रीय अध्यक्षांकडे अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. अभ्यासाच्या अहवालाच्या अनुषंगाने, सद्यस्थितीच्या संदर्भात योग्य उपाय राबवले जातील असे आयएमए तर्फे सांगण्यात आले आहे.

आयएमए सत्यशोधक समितीमधील सदस्य कोण?
डॉ. अशोक आढाव (आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, नागपूर), डॉ. रवी वानखेडेकर (आयएमए माजी राष्ट्रीय अध्यक्ष, धुळे), डॉ. चंद्रकांत म्हस्के, (डीन जीएमसी नांदेड),  डॉ. होझी कपाडिया, (आयएमए  प्रदेशाध्यक्ष, मुंबई) डॉ. सुहास पिंगळे, (आयएमए  राज्य सचिव) या सदस्यांचा समावेश आहे.

Web Title: fact finding committee appointed in dr. payal tadwi suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.