भीमा-पाटसची ईडी चौकशी लावल्यास वस्तुस्थिती पुढे येईल : रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:16 AM2021-08-27T04:16:32+5:302021-08-27T04:16:32+5:30

थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी रुपये कारखाना सुरू ठेवण्यासाठी दिले होते की कारखाना बंद पाडण्यासाठी. कारण ...

Fact will come to light if ED investigates Bhima-Patas: Ramesh Thorat | भीमा-पाटसची ईडी चौकशी लावल्यास वस्तुस्थिती पुढे येईल : रमेश थोरात

भीमा-पाटसची ईडी चौकशी लावल्यास वस्तुस्थिती पुढे येईल : रमेश थोरात

Next

थोरात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी रुपये कारखाना सुरू ठेवण्यासाठी दिले होते की कारखाना बंद पाडण्यासाठी. कारण ३६ कोटी मिळाल्यानंतर काही महिन्यांतच भीमा पाटस कारखाना बंद पडला. मग हे ३६ कोटी गेले कुठे? भाजपाचे आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल बनवाबनवी करण्यात कुणालाच ऐकणार नाही, गेल्या काही वर्षांपूर्वी भीमा पाटस कारखान्यातील साखर गोडावूनमध्ये शॉर्टसर्किटमुळे साखरेचे पोते जळाले असे सांगण्यात आले होते. मात्र सदरच्या गोडावूनमध्ये साधी वायर किंवा लाईट नव्हते तेव्हा साखरेचे पोते शॉर्टसर्किटने जळाले नाही तर साखरेचे पोते जाळण्यात आले होते. परिणामी, ७० हजार साखर पोते परस्पर विकण्यात आले. मात्र, कारण साखर पोते जळालेे म्हणून दाखविण्यात आले असा आरोप रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला.

--

कोट

चौकशी लावा, सत्य समोर येईल

भीमा पाटस कारखान्यापासून चौकशी लावावी, तसेच कारखान्याच्या संदर्भात साखर आयुक्ताकडे संबंधितांनी तक्रारी केलेल्या आहेत, तेव्हा साखर आयुक्त चौकशी करतील आणि त्यातून सत्य पुढे येईल.

- राहुल कुल, आमदार

Web Title: Fact will come to light if ED investigates Bhima-Patas: Ramesh Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.