ऊसतोडणी कामगारांच्या कोरोना सुरक्षेची जबाबदारी कारखान्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:32 AM2020-09-04T02:32:54+5:302020-09-04T02:33:21+5:30
कामगारांनी यंदाच्या वर्षी मुलांना सोबत आणू नये असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे. तरीही त्यांच्यासाठी पाळणाघरे, साखरशाळा सुरू करण्यास सांगितले आहे.
पुणे: ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी साखर कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. कामगारांंना मास्क, सँनीटायझर देण्याबरोबरच त्यांची नियमीत आरोग्य तपासणी व औषधोपचारही कारखान्यांना करावे लागणार आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने तज्ज्ञ डॉक्टरांबरोबर सल्लामसलत करून त्याचा आराखडा तयार केला आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यंदा १८० कारखाने गाळप सुरू करतील असा अंदाज आहे. अंदाजे ७ लाख कामगार त्यासाठी गावे सोडून येतील. या सर्व कामगारांना प्रत्येकी किमान २ मास्क, साबण वड्या, सँनिटायझरच्या बाटल्या कारखान्यांनी पुरवायच्या आहेत. कामगारांची नियमीत आरोग्य तपासणी करणे, लक्षणे आढळल्यास त्याला विलग करणे ही कामेही मुकादमाच्या सा'ाने त्यांनीच करायची आहेत.
कामगारांनी यंदाच्या वर्षी मुलांना सोबत आणू नये असे आवाहन साखर आयुक्तालयाने केले आहे. तरीही त्यांच्यासाठी पाळणाघरे, साखरशाळा सुरू करण्यास सांगितले आहे.