आॅक्टोबरमध्येही कारखाने सुरू होण्याची आशा धूसर

By admin | Published: October 15, 2015 12:57 AM2015-10-15T00:57:44+5:302015-10-15T00:57:44+5:30

राज्य सरकारने १५ आॅक्टोेबरला राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची परवानगी जरी दिली असली, तरीही ऊसतोडणी वाहतूक व मुकादम संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे

The factory hopes to start the factory in October | आॅक्टोबरमध्येही कारखाने सुरू होण्याची आशा धूसर

आॅक्टोबरमध्येही कारखाने सुरू होण्याची आशा धूसर

Next

सोमेश्वरनगर : राज्य सरकारने १५ आॅक्टोेबरला राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्याची परवानगी जरी दिली असली, तरीही ऊसतोडणी वाहतूक व मुकादम संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत एकही ऊसतोडणी मजूर कारखान्यावर पाठविणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू होण्याची आशा धूसर झाली आहे.
गेल्या वर्षी त्यांनी आॅगस्ट महिन्यातच संप पुकारला होता. अडीच महिने संपर्क करूनही संघटनांना काहीच फलित मिळाले नाही. याही वर्षी गेल्या वर्षीच्या मागण्या घेऊन या संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.
याबाबत संघटनांनी राज्य सरकार व साखर संघ यांना लेखी कळविले आहे. कारखाने लवकर सुरू करून एप्रिलअखेर ऊस संपविण्याच्या आशेवर ऊसतोडणी संघटनांनी पाणी फिरविले आहे.
हा संप लवकर न मिटल्यास गाळप हंगाम लांबण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्याच्या पुढे पाण्याअभावी कारखाने चालविणे कारखान्यांपुढे एक आव्हान असेल. गेल्या वर्षी भाजपा सरकार सत्तेवर नवीन आले होते; त्यामुळे ग्र्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विनंतीवरून बीडच्या संघटनेने संपामधून माघार घेतल्याने संपामध्ये फूट पडली होती. मात्र, या वर्षी संघटना आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे चित्र आहे.
याबाबत संघटनांनी राज्य सरकार व साखर संघ यांना लेखी कळविले आहे. मात्र, संघटनांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटना करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The factory hopes to start the factory in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.