‘फडणवीस यांना गृहखात्याला वेळ देता आला नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 04:49 AM2020-01-07T04:49:37+5:302020-01-07T04:49:47+5:30
पाच वर्षाच्या काळात गृहमंत्रिपदाचा कारभार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता.
बारामती : पाच वर्षाच्या काळात गृहमंत्रिपदाचा कारभार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. त्यांना या खात्याकडे वेळ देता आलेला नाही. नागपूरसारख्या शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
गृहमंत्री देशमुख मंगळवारी गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. ते म्हणाले, गृहमंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक असतात. आपल्याला मिळालेल्या या महत्त्वाच्या पदाच्या माध्यमातून राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन केले जाईल.