प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका, एसटी कर्मचा-यांचा संपाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:04 AM2017-10-18T02:04:01+5:302017-10-18T02:04:17+5:30
थोड्या अंतरासाठी खासगी वाहनचालक जास्त भाडे आकारत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. हा बसचा संप त्वरित मिटावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
ओतूर : महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार संघटना, कृती समिती, इंटक, संघर्ष ग्रुप आदींनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. कारण ओतूर बसस्थानकात एकही बस आली नाही किंवा गेली नाही, अशी माहिती ओतूर बसस्थानक प्रमुख नामदेव गवारी यांनी दिली.
नगर कल्याण व कल्याण नगर या महामार्गे दररोज जाऊन येऊन बसगाड्यांचे ३०० फेरे, दिवाळी निमित्त १०० जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. नारायणगाव आगाराच्या ओतूर येथून विविध गावांना जाणारया येणाºया बसच्या ३०० फेºया या शिवाय अकोले, पुणे शिवाजीनगर आगाराच्या बसेस ओतूरहूनच येतात. एकूण दररोज ५६८ फेºया होतात. संपामुळे एकही बस आली नाही. एस.टी.च्या संपाचा फटका महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, बस स्थानकावरील हातगाडीवर विक्री करणारे फेरीवाले यांचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान संप मिटून सेवा पूर्ववत व्हावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
भोर बसस्थानकात शुकशुकाट;
भोर : पदनिहाय वेतनश्रेणीसह ७वा वेतन आयोग मंजूर करावा, कामगारांवर लादलेली जुलमी परिपत्रके रद्द करावी, कनिष्ठ कर्मचाºयांच्या त्रुटी दूर करण्यासाठी व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारला आहे. एसटीच्या सर्व गाड्या बंद असल्यामुळे आज दिवसभर प्रवाशांचे मोठे हाल झाले.
एसटी कर्मचा-यांच्या संपात भोर आगारातील १४० चालक, ११२ वाहक, ३१ कार्यशाळा कर्मचारी व इतर २४ असे एकूण ३०७ कर्मचारी संपावर गेल्यामुळे भोर-पुणे ७५ फेºया तर एकूण २४६ फेºया रद्द होणार असून, दररोजचा सुमारे २० हजार किलोमीटरचा प्रवास थांबणार असून दररोजचे ७ लाखाचे उत्पन्न बुडणार आहे. सदर संपामुळे ग्रामीण भागातील एसटी फेºया बंद होणार असल्याने शालेय विद्यार्थी व नागरिकांचे ऐन दिवाळीत हाल होणार असून संपाचा फटका लोकांना बसणार आहे. सदर संपात भोर आगारातील मोहन जेधे, गणेश मळेकर, दिलीप वरे, विजय राऊत, राजेंद्र भेलके, बाळासो धाप्ते, दीपक कांबळे, चंद्रकांत शिंदे, मनोज पाटणे, किसन देवघरे, बापू बांदल, सर्जेराव पडवळ, किरण गायकवाड व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
सासवड आगारात एसटी बंदला पाठिंबा
सासवड : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने राज्यात आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या काम बंदला सासवड आगारात १०० टक्के पाठिंबा मिळाला. दि. १६ सोमवारी रात्री १२ पासून सासवड आगारातील कामगार चालक वाहक कामावर न आल्याने सासवड आगाराच्या होणाºया एकूण २०६ फेºया रद्द झाल्या. एकही बसची फेरी न झाल्याने एसटीचे ऐन सणासुदीच्या काळातील उत्पन्न घटले आहे.
ऐन दिवाळीच्या वेळी हा संप सुरू झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नगर कल्याण मार्गे ओतूर येथून ३०० रुपये, आळेफाटा २० रुपये, नारायणगाव जुन्नर येथे जाण्यासाठी ओतूरहून २५ रू. ब्राम्हणवाडा २० रू दर खासगी वाहतूक करणारे घेत आहेत. प्रवाशांना नाइलाजास्तव आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.