प्रवासी खेचण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 05:16 AM2018-04-23T05:16:52+5:302018-04-23T05:16:52+5:30

पीएमपी प्रशासनाची केवळ घोषणाबाजीच : प्रवाशांच्या संख्येत किंचित घट

Failure to pull passengers | प्रवासी खेचण्यात अपयश

प्रवासी खेचण्यात अपयश

Next

पुणे : लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना बससेवेकडे पुणेकरांना आकर्षित करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अपयश आले आहे. पीएमपीची स्थिती सुधारण्याची केवळ घोषणाबाजीच होत राहिल्याने प्रवासी संख्येत वाढ झालेली
नाही. मात्र, अद्यापही सुमारे दहा लाख प्रवाशांचा पीएमपी सेवेवर भरवसा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील काही वर्षांत पीएमपीची दुरवस्था होऊनही प्रवाशांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही स्थिती चांगल्या बससेवेची गरज दर्शविते.
पीएमपीकडून पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह लगतच्या भागातही बससेवा पुरविली जाते. मागील काही वर्षांपासून लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे. पुणे व पिंंपरी चिंचवड शहरांत शिक्षण व नोकरीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख तर पिंपरी चिंचवडची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. त्या तुलनेत पीएमपीकडील बस आणि प्रवासी संख्येत मात्र वाढ झालेली नाही.
सध्या पीएमपीकडे भाडेतत्त्वावरील बससह सुमारे २ हजार बस आहेत. मागील काही वर्षांपासून त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. आर्थिक वर्ष २०१४-१५मध्ये सरासरी २०८७ बस होत्या. त्यापैकी १३६४ बस मार्गावर होत्या. तर यावर्षी एप्रिल महिन्यात प्रवासी संख्या सुमारे १० लाख १६ हजार एवढी होती. त्यानंतर पुढील तीनही वर्षे प्रवासी संख्येसह एकूण बसची संख्याही थोडी घटल्याचे दिसते.
मागील चार वर्षांत २०१५-१६ मध्ये प्रवासी संख्येने १२ लाखांचा टप्पा ओलांडला होता. तर मागील वर्षीच याच महिन्यात ही संख्या
सुमारे ११ लाख ६६ हजार एवढी होती. जून ते मार्च या कालावधीमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू असतात. बसने प्रवास करणाºया
विद्यार्थ्यांची संख्याही अधिक असल्याने यादरम्यान बस ओसंडून वाहतात. तर एप्रिल व मे महिन्यात दरवर्षी प्रवासी संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अनेकदा ही संख्या १० लाखांच्या खाली जाते.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रवाशांना सेवा देण्यात ‘पीएमपी’ मागे पडली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. मात्र, काही प्रमाणात नियमित प्रवाशांना कायम ठेवण्यात यश मिळाल्याचे दिसते. अपुरी बससंख्या, बे्रकडाऊन, अनियमितता या कारणांमुळे अनेक नियमित प्रवासी बसकडे पाठ फिरवत असले तरी दरवर्षी नवीन प्रवासी जोडले जात आहेत. त्यामुळे असुविधा होत असूनही प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसत नाही. यावरून लाखो प्रवाशांना बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होते.

प्रवासी संख्येत वाढ झाली नसली तरी त्यात लक्षणीय घटही झाल्याचे दिसत नाही. ‘पीएमपी’ प्रशासनाकडून नवीन बससह प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. अधिकाधिक प्रवासी आकर्षित करण्यासाठी नवीन मार्ग सुरू करणे, बस वाढविणे, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे, पीएमपीची प्रतिमा सुधारणे, अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे ‘पीएमपी’तील अधिकाºयांनी सांगितले.
 

Web Title: Failure to pull passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Travelप्रवास