छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:24 IST2024-10-23T13:24:38+5:302024-10-23T13:24:49+5:30
तीन ते चार ट्रेकर्स रविवारी कलावंतीण दुर्गावर चालले होते, दुर्गावरील वरच्या भागात असतानाच त्या ट्रेकरच्या छातीत दुखायला लागले

छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू
पुणे : पनवेल तालुक्यातील कलावंतीण दुर्ग येथे मित्रांसह ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील ट्रेकरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आनंद शहापूरकर (४७, रा. पुणे) असे मृताचे नाव असून, ही घटना रविवारी (दि. २०) घडली आहे. दरम्यान, ट्रेकरच्या छातीत अचानक दुखायला लागले आणि ताे चक्कर येऊन बेशुद्ध पडला. तेव्हा त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच मृत्यू झाला.
याबाबत गिरीप्रेमीचे संचालक उमेश झिरपे यांनी माहिती देताना सांगितले की, तीन ते चार ट्रेकर्स रविवारी कलावंतीण दुर्गावर चालले होते. दुर्गावरील वरच्या भागात असतानाच आनंद यांच्या छातीत दुखायला लागले. मित्रांनी मदतीसाठी गावकऱ्यांना बोलाविले. गावकरी तिथे गेले. सर्वांनी मिळून त्याला खाली आणले. मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी स्थानिक पोलिस हजर होते. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.