फैजल, इशाक, पारस, सूरज यांचे पात्रता फेरीतच खळबळजनक विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:04+5:302021-03-23T04:11:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित १५ ...

Faisal, Ishaq, Paras, Suraj's thrilling victory in the qualifying round | फैजल, इशाक, पारस, सूरज यांचे पात्रता फेरीतच खळबळजनक विजय

फैजल, इशाक, पारस, सूरज यांचे पात्रता फेरीतच खळबळजनक विजय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित १५ हजार डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत फैजल कुमार, इशाक इकबाल, पारस दहिया, सूरज आर प्रबोध रणजित विराली-मुरुगुसेन या भारतीय खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या दहाव्या मानांकित फैजल कुमार याने अव्वल मानांकित अनिरुद्ध चंद्रसेखरचा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. इशाक इकबाल याने अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत नवव्या मानांकित चंद्रिल सूदचा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. बाराव्या मानांकित पारस दहिया याने पाचव्या मानांकित रोमानियाच्या जॉर्ज बोटझेनचा तर, तेराव्या मानांकित रणजित विराली-मुरुगुसेन याने सहाव्या मानांकित ऋषी रेड्डीचा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरी गाठली.

सातव्या मानांकित भारताच्या एन. विजय सुंदर प्रशांत याने अमेरिकेच्या पंधराव्या मानांकित प्रेस्टन ब्राऊनचे आव्हान संपुष्टात आणले. अकराव्या मानांकित सूरज आर प्रबोध याने आठव्या मानांकित मुतु आदीथ्य सेंथीलकुमारवर सहज विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम पात्रता फेरी :

पुरुष गट : फैजल कुमार (१०) वि.वि. अनिरुद्ध चंद्रसेखर (१) ६-४, ३-६, १७-१५,

इशाक इकबाल वि.वि. चंद्रिल सूद (९) ६-३, ६-२,

ओमनी कुमार, अमेरिका (३) वि.वि. दिग्विजय प्रताप सिंग (१४) ७-६ (१), ७-५,

हेनरी पॅटन, ग्रेट ब्रिटन (४) वि.वि. लिओनार्ड कॅटनी, इटली (१६) ६-२, ६-४,

पारस दहिया (१२) वि.वि. जॉर्ज बोटझेन, रोमानिया (५) ६-२, ६-३,

रणजीत विराली-मुरुगुसेन (१३) वि.वि. ऋषी रेड्डी (६) ७-५, २-६, १०-४,

एन. विजय सुंदर प्रशांत (७) वि.वि. प्रेस्टन ब्राऊन, यूएसए (१५) ६-२, ६-१,

सूरज आर प्रबोध (११) वि.वि. मुतु आदीथ्य सेंथीलकुमार (८) ६-२, ६-२;

Web Title: Faisal, Ishaq, Paras, Suraj's thrilling victory in the qualifying round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.