बनावट जामीन कागद तयार करणारी टोळी उजेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:05+5:302020-12-24T04:11:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयात जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या ...

Fake bail paper making gang in the spotlight | बनावट जामीन कागद तयार करणारी टोळी उजेडात

बनावट जामीन कागद तयार करणारी टोळी उजेडात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : न्यायालयात जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एकावेळी छापे घालून पोलिसांनी १३ जणांना अटक केली. तसेच २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले गेले आहेत.

शिवाजीनगर, लष्कर, वडगाव यासह वेगवेगळ्या न्यायालयात चोरी, जबरी चोरी, घरफोड्या, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करुन ते न्यायालयात सादर केले जात. यात आधार कार्ड, रेशन कार्ड आणि सात बारा उतारे बनावट तयार केले जात. ती जामिनासाठी न्यायालयात सादर करुन जामीन मिळवून दिला जात असे. जामीन मिळाल्यावर हे आरोपी पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात पुढील तारखांना हजर रहात नसत. मात्र, त्याचवेळी त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरु रहात.

याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली. त्यानुसार पुण्यात प्रशिक्षणासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी एकाचवेळी सर्व बाजूने साध्या वेशात वेढा दिला. आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या आरोपींना ताब्यात घेतले.

लष्कर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रदीप साखरे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी निलेश नंदकुमार शहाणे (वय २७, रा. दत्तवाडी), महारुद मंदरे (वय २६, रा. माणिकबाग), असिफ शेख (वय २७, रा. क़ात्रज), मोहसिन सय्यद (वय ४८, रा. दळवीनगर, निगडी), रशिद सय्यद (वय ४९, रा. शांतीनगर), अमीर मुलाणी (वय ४४, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली असून रणजित सूर्यवंशी आणि गोपाळ कांगणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट ४ पासून काही अंतरावर एका एजंटला पोलिसांनी पकडले. नागेश माणिक बनसोडे (वय ३९, रा. पिंपरी) याला अटक केली आहे. तसेच भावेश शिंदे (वय ३३, रा. सोलापूर बाजार, वानवडी), विकी पुडगे (वय २८, रा. पिंपळेनगर, सांगवी), कल्पेश इंगोले (वय १८), सोनू अशोक जगधने (वय २९, रा. पुणे रेल्वे स्टेशन), शशांक साळवी (वय ३१, रा. दापोडी), शुभम लांडगे (वय १९, रा. देहुरोड) यांना अटक करण्यात आली आहे.याशिवाय दाविद पहिलवान (वय २७, रा.दापोडी), विशाल गरड (वय ३३, रा.आनंदनगर, चिंचवड), विलास धेंडे (वय ५७, रा.पर्वतीदर्शन) सुरेश डेंगळे (वय २५, रा.चिखली), प्रमोद जगताप (वय ५८, रा.बारामती), प्रविण ससाणे (वय ४४, रा.बालेवाडी फाटा), मारुती कुदळे (वय ४३, रा.नाना पेठ), रणजित सूर्यवंशी आणि गोपाळ कांगणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Fake bail paper making gang in the spotlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.