बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक
By admin | Published: December 19, 2015 03:08 AM2015-12-19T03:08:29+5:302015-12-19T03:08:29+5:30
वेगवेगळ्या बँकांचे एकाच व्यक्तीच्या नावाने बनावट क्रेडिट व डेबिट कार्ड काढून दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीस पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून, दुसरा आरोपी
पिंपरी : वेगवेगळ्या बँकांचे एकाच व्यक्तीच्या नावाने बनावट क्रेडिट व डेबिट कार्ड काढून दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीस पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून, दुसरा आरोपी पसार आहे. विश्वजित डुंबर बहादूर छत्री (वय २६, रा. मालाड पूर्व, मुंबई) असे या अटक केलेल्याचे नाव असून, त्याचा साथीदार राहुल ऊर्फ फ्रेजी हा पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित मगलाणी (रा. काळेवाडी, पिंपरी) यांचे पिंपरी मार्केटमध्ये मोबाइलचे दुकान आहे. या दुकानात येऊन आरोपी विश्वजित छत्री व त्याचा साथीदार राहुलने एका कंपनीचा मोबाइल व मोटारीतील चार्जर असा एकूण ७२ हजार ६८० रुपयांचा माल खरेदी केला. पैसे देण्यासाठी या दोघांनी वेगवेगळ्या तीन बँकांचे क्रेडिट कार्ड स्वॅपसाठी दिल्यावर त्या पावतीवर अरविंद त्यागी यांचे नाव आले. यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून त्यांनी पुणे आरटीओची अरविंद त्यागी नावाच्या झेरॉक्सची प्रतही दिली. माल घेऊन दुकानाच्या बाहेर जात असताना दुकानमालकाला ग्राहक केंद्र
बंगळुरू येथून फोन आला.
‘त्या व्यक्तींना कोणतीही वस्तू
विकू नका. ते फसवणूक करत आहेत,’ असे सांगितले. त्या वेळी दोघे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षारक्षकाच्या मदतीने विश्वजित छत्री या
आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)